घरताज्या घडामोडी'Facebook'ला मोठा झटका ; कंपनीचा क्रिप्टो प्रोजेक्ट विकला गेला

‘Facebook’ला मोठा झटका ; कंपनीचा क्रिप्टो प्रोजेक्ट विकला गेला

Subscribe

फेसबुक म्हणजेच आताचा मेटाला जोरका झटका लागला आहे. फेसबुक ही कंपनी आपल्या स्टेबल क्वॉइन प्रोजेक्ट Diem Association ला विकत आहे. silvergate Bank ने घोषित केले आहे की, Diem चे एसेट्स विकत घेतले आहेत . फेसबुकने सर्वांत पहिले याला Libraच्या नावाने 2019 मध्ये लॉंच केले होते.

फेसबुक म्हणजेच आताचा मेटाला जोराचा झटका लागला आहे. फेसबुक ही कंपनी आपल्या स्टेबल क्वॉइन प्रोजेक्ट Diem Association ला विकत आहे. silvergate Bank ने घोषित केले आहे की, Diem चे एसेट्स विकत घेतले आहेत. फेसबुकने सर्वांत पहिले याला Libraच्या नावाने 2019 मध्ये लॉंच केले होते. Diem Association मध्ये एका निवेदनात म्हटले आहे की, येणाऱ्या काही दिवसांतच आपल्या ग्रुपला आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांना विकण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

Silvergate ने एका प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, Diem चा विकास होत आहे. याशिवाय डिप्लॉयमेंट आणि ऑपरेशन टूललासुद्धा घेण्यात येणार आहे,जेणेकरुन, ब्लॉकचेन बेस्ट पेमेंट नेटवर्क चालवता येईल, Diemच्या कामाला प्री-लॉंच फेज सांगितले जात आहे. जेव्हा प्रथम 2019 मध्ये Diem लॉंच करण्यात आले. तेव्हापासून Diem ला रेगुलेटर पासून सतत झटके लागत आहेत. एका अहवालानुसार, Diem मागील आठवड्यापासून याच्या एसेट्स विकण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. Diemने एका निवदनात म्हटले आहे की, वरिष्ठ नियामकाच्या मते, हा यूएस सरकारने पाहिलेला सर्वोत्तम डिझाइन स्टेबलकॉइन प्रकल्प आहे. मात्र, ते म्हणाले की, या संभाषणातून हे स्पष्ट झाले की, फेडरल रेग्युलेटक Diem लॉंच करु शकणार नाही.

- Advertisement -

Silvergate ने सांगितले की, त्यांनी Class A साठी सर्वसामान्य समभागांसाठी $132 दशलक्ष जारी केले आहेत. याशिवाय, त्याने आपली मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी 50 दशलक्ष डॉलर्स अतिरिक्त रोख दिले आहेत. याआधी, सिल्व्हरगेटने गेल्या वर्षी डायम असोसिएशनच्या भागीदारीत डॉलर-बेक्ड स्टेबलकॉइन्स लाँच करण्याचा प्रयत्न केला.

सिल्व्हरगेट आता स्टेबलकॉइन रिझर्व्हचे व्यवस्थापन करेल तसेच स्टेबलकॉइन्स स्वतः जारी करेल. मेटा ने यापूर्वी २०१९ मध्‍ये Calibra (आता Novi) ही जागतिक आर्थिक सेवा म्हणून सादर केली होती. त्या वेळी, गुंतवणूकदारांनी त्याच्या क्रिप्टोकरन्सी लिब्रा (आता Diem) सह त्याचे समर्थन केले.त्यावेळी कंपनीने सांगितले होते की, कॅलिब्राचे पहिले उत्पादन लिब्रासाठी डिजिटल वॉलेट असेल. मेसेंजर, व्हॉट्सअॅप व्यतिरिक्त एक वेगळे अॅप 2020 मध्ये उपलब्ध होईल. मात्र, ही कल्पना नियामकांना पसंत पडली नाही. यानंतर, कंपनीने Diemच्या रूपात एक साधे वर्जन सादर केले, ज्याला अमेरिकन डॉलरचा पाठिंबा होता.

- Advertisement -

हे ही वाचा – Union Budget 2022- सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा, PM Awas योजनेतून मिळणार 80 लाख घरं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -