घरElection 2023Telangana Election Result 2023 : 'पीएम' होता होता केसीआर यांनी मुख्यमंत्रीपदही गमावले

Telangana Election Result 2023 : ‘पीएम’ होता होता केसीआर यांनी मुख्यमंत्रीपदही गमावले

Subscribe

Telangana Election Result 2023 : मध्यप्रदेश, छत्तीसड आणि राजस्थानसह तेलंगणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. तेलंगाणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल आहे. येथे भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) पराभूत करुन काँग्रेसने विजयाचा झेंडा फडकवला आहे. माजी मुख्यमंत्री आणि बीआरएसचे अध्यक्ष केसीआर यांचा राष्ट्रीय राजकारणात येण्याचा मोह त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण मानले जात आहे. तिसरी आघाडी स्थापन करुन पंतप्रधान होण्याची त्यांची इच्छा लपून राहिली नव्हती. यासाठी त्यांचे विविध राज्यात वाढलेले दौरे आणि यामुळे गृहराज्य तेलंगणाकडे झालेले दुर्लक्ष या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे रविवारी लागलेला तेलंगणाचा निकाल आहे.

तेलंगाणा (Telangana) राज्याची 2013 मध्ये स्थापना झाली. त्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव (KCR) मुख्यमंत्री म्हणून हॅट्रिक करतील अशी अनेकांना आशा होती. मात्र सलग दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासह त्यांच्या बीआरएस पक्षाला मोठा झटका बसला आहे. केसीआर यांच्या पराभवासाठी प्रमुख कारण हे त्यांची राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाककांक्षा मानले जात आहे

- Advertisement -

हेही वाचा : Telangana Election : पिछाडीवर असूनही बीआरएस नेत्यांकडून विजयाचा दावा, हालचालींना वेग

केसीआर यांनी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवले होते. त्यानंतर त्यांनी आगामी लोकसभेसाठी (2019) तिसऱ्या आघाडीचा पर्याय अनेक पक्षांसमोर ठेवला होता. नुकत्याच स्थापन झालेल्या INDIA आघाडीतही ते याच कारणामुळे सहभागी झालेले नाही. राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेपोटीच केसीआर यांनी त्यांच्या तेलंगणार राष्ट्र समिती (TRS) पक्षाचे नाव ऑक्टोबर 2022 मध्ये बदलले आणि भारत राष्ट्र समिती (BRS) केले होते.

- Advertisement -

तेलंगणा – महाराष्ट्र सीमाभागात वाढलेले दौरे

तेलंगणामध्ये वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले तेव्हा, काँग्रेसने (Congress) ही भाजपची बी टीम असल्याचा प्रचार करायला सुरुवात केली, तर भारतीय जनता पक्षाने (BJP) केसीआर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन वातावरण निर्मिती सुरु केली होती. राज्यात केसीआर यांच्याविरोधात प्रचार सुरु असताना ते महाराष्ट्रात बीआरएस वाढवण्यासाठी दौर करत होते. पंढरपूर येथे 700 गाड्यांचा ताफा घेऊन पक्षवाढीसाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. तेलंगणाला लागून असल्या महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये त्यांचे वाढलेले दौरे. जाहीर सभा यामुळे त्यांचे गृहराज्य तेलंगणाकडे दुर्लक्ष झाले. केसीआर यांचा महाराष्ट्र दौरा किंवा सभा, रॅली असेल तेव्हा संपूर्ण तेलंगणा कॅबिनेट घेऊन ते फिरत होते.

विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी

केसीआर यांची नांदेड, छ. संभाजीनगर, पंढरपूर येथे मोठमोठ्या सभा झाल्या. एवढेच नाही तर महाराष्ट्रात केवळ सभा, संमेलन आणि रॅली घेऊनच ते थांबले नाही तर, त्यांनी भाजप विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. त्यामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा समावेश होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही त्यांनी भेट घेऊन भाजप आणि काँग्रेस वगळून तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न केले होते.

राष्ट्रीय नेतृत्वाच्या मोहामुळे…

तेलंगणामध्ये दहा वर्षे एकहाती सत्ता राखल्यानंतर केसीआर यांना राष्ट्रीय नेते होण्याचा मोह झाला असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणून प्रस्थापित करण्याच्या मोहामुळे त्यांना तेलंगणामध्ये काँग्रेस किती आतमध्ये घुसत गेली आहे, हे त्यांच्या लक्षातच आले नाही. तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून आपण एकमेव आहोत आणि बीआरएसला गृहराज्यात काहीही धोका नाही, या आत्मविश्वासात केसीआर होते. मात्र त्यांचा डाव उलटा पडला. राष्ट्रीय नेता होण्याचा मोह आणि अतिआत्मविश्वासमुळे केसीआर यांना तेलंगणा गमवावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -