Ranjit Singh Murder Case: रणजीत हत्याकांडात CBIचा मोठा निर्णय! डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमसह ५ जण दोषी

सीबीआय स्पेशल कोर्ट १२ ऑक्टोबरला सर्व दोषी आरोपींना शिक्षा सुनावणार

Big decision of CBI Dera chief Gurmeet Ram Rahim and 5 others convicted in Ranjit murder case
Ranjit Singh Murder Case: रणजीत हत्याकांडात CBIचा मोठा निर्णय! डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमसह ५ जण दोषी

हरियाणाच्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम ( Dera chief Gurmeet Ram Rahim ) यांना मोठा झटका देण्यात आला आहे. रणजीत सिंह (Ranjit Singh )हत्या प्रकरणात सीबीआय कोर्टात सुनावणी झाली असून राम रहीमसह पाच आरोपांनी दोषी ठरवण्यात आले आहे. (Dera chief Gurmeet Ram Rahim and 5 others convicted in Ranjit murder case) त्यांनी कोणत्या प्रकारची शिक्षा होणार याविषयी खुलासा करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय स्पेशल कोर्ट १२ ऑक्टोबरला सर्व दोषी आरोपींना शिक्षा सुनावणार आहे. राम रहीम, कृष्ण लाल, सबगिल, अवतार आणि जसबीर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. यातील इंद्रसेन या एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.

रणजीत सिंह हत्या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी झाली. या सुनावणीला आरोपी गुरमीत राम रहीम आणि कृष्णा कुमार व्हिडिओ कॉन्सफर्न्सिंगद्वारे हजर राहिले होते तर आरोपी अवतार,जसवीर आणि सबदिल यांना प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी सीबीआयला २६ ऑगस्ट रोजी करायची होती. हे प्रकरण १९ वर्ष जुने आहे. १२ ऑगस्टरोजी या प्रकरणी अंतिम सुनावणी झाली होती. आज सीबीआयचे न्यायाधीश डॉ. सुशील कुमार गर्ग यांच्या कोर्टात जवळपास दीड तास सुनावणी केल्यानंतर आरोपींवर दोषी म्हणून शिक्का मोर्तब करण्यात आला. राम रहीमची केसची सुनावणी आधी सीबीआय न्यायधीश असलेले जगदीप सिंह यांनी केली होती मात्र त्यांच्या बदली नंतर ती केस न्यायाधीश गर्ग यांच्याकडे सोपवण्यात आली.

काय आहे रणजीत हत्याकांड प्रकरण?

१० जुलै २००२ साली डेरा मॅनेजर रजणीत सिंह यांची राम रहीम याने गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणी सीबीआय कोर्टाकडून राम रहीमला कलम ३०२ आणि १२० B अंतर्गत दोषी घोषित केले होते. त्यानंतर १२ जुलैला राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानुसार राम रहीम हरियाणाच्या रोहतक सुनरिया जेलमध्ये शिक्षा भोगत होता.

रणजीत सिंह हा राम रहीमच्या डेऱ्याचा मॅनेजर तसेच त्याचा कट्टर भक्त होता. मात्र राम रहीमने रणजीत सिंहची गोळी घालून हत्या केली. तब्बल १९ वर्षांनी राम रहीमला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.

राम रहीमला कोर्टाने साध्वींच्या बलात्कार प्रकरणातही ताब्यात घेऊन त्याला २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. रणजीत सिंह यांची हत्या, सांध्वी बलात्कार प्रकरणी आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या केल्याप्रकरणी देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


हेही वाचा – ‘येथे कमवतात आणि पाकिस्तानला पाठवतात’ -साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा शाहरुखवर निशाणा