घरअर्थजगतनोव्हेंबर महिन्यात GST कलेक्शनमध्ये नोंदवली मोठी वाढ, सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा

नोव्हेंबर महिन्यात GST कलेक्शनमध्ये नोंदवली मोठी वाढ, सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा

Subscribe

नवी दिल्ली : देशातील जीएसटी संकलनात बंपर वाढ नोंदवली गेली आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 1.68 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत यात 15 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. जीएसटी संकलनात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.

हेही वाचा – Good News For BJP : मतमोजणी आधीच भाजपाच्या दृष्टीने पाच आनंदाच्या बातम्या

- Advertisement -

नोव्हेंबर 2023 हा महिना सरकारसाठी अतिशय अनुकूल महिना ठरला आहे. मासिक जीएसटी संकलन 1.5 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचण्याचा हा सलग नववा महिना आहे. अर्थ मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022च्या तुलनेत नोव्हेंबर 2023मध्ये जीएसटी संकलनात 15 टक्क्यांचा वाढ झाली आहे. GST संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची 2023-24 या आर्थिक वर्षातील ही सहावी वेळ आहे.

- Advertisement -

सणासुदीच्या काळामुळे आलेख चढता

सणासुदीच्या काळामुळे जीएसटी संकलनाचा आलेख चढता राहिला होता. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी तसेच अन्य सणांमुळे जीएसटी संकलनात मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2024मध्ये 1.68 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. तथापि, गेल्यावर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत वाढ नोंदवली गेली असली तरी, ऑक्टोबर 2023च्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलन 1.72 लाख कोटी रुपये होते.

हेही वाचा – Ajit Pawar Vs. Awhad : …आणि कर्तृत्व सिद्ध करून दाखवा, जितेंद्र आव्हाडांचे अजित पवारांना आव्हान

अशी आहे आकडेवारी

अर्थ मंत्रालयाने जीएसटी संकलनाचा डेटा जारी केला आहे, त्यानुसार नोव्हेंबर 2023मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,67,929 कोटी रुपये होते, तर आधीच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये ते 1,72,003 कोटी रुपये होते. सप्टेंबर महिन्यात 1,62,712 कोटी रुपये, ऑगस्ट महिन्यात 1,59,068 कोटी रुपये, जुलै महिन्यात 1,65,105 कोटी रुपये, जून महिन्यात 1,61,497 कोटी रुपये, मे महिन्यात 1,57,090 कोटी रुपये होते. एप्रिल महिन्यात 1,87,035 कोटी रुपये होते आणि हा आजपर्यंतचा उच्चांक आहे.

महाराष्ट्राचे मोठे योगदान

नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात 25,585 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. त्याखालोखाल कर्नाटक 11,970 कोटी रुपये, गुजरात 10,853 कोटी, तामिळनाडू 10,255 कोटी, हरियाणा 9732 कोटी, उत्तर प्रदेश 8973 कोटी, दिल्ली 5,347 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले.

हेही वाचा – LPG price hike : मोदी सरकारची ही नेहमीची हातचलाखी…, ठाकरे गटाचे टीकास्त्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -