भाजपाचे बडे नेते सीमाभागात कधी फिरकलेच नाहीत; संजय राऊतांचा मोठा आरोप

Thackeray Group leader Sanjay Raut Criticised PM Narendra Modi
Thackeray Group leader Sanjay Raut Criticised PM Narendra Modi

बेळगाव : कर्नाटक निवडणुकीनिमित्त ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) सध्या बेळगाव (Belgaum) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपाच्या बड्या नेत्यांवर आरोप (Allegations against big leaders of BJP) केला आहे. भाजपाचे बडे नेते कर्नाटक दौऱ्यावर आले, परंतु ते सीमाभागात आले नाही आणि त्यांनी सीमाभागात वारंवार येणे टाळल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, आमची बांधिलकी महाराष्ट्र एकीकरण समितीशी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती म्हणजे शिवसेना असे आम्ही माणतो. आमचा कोणताही राजकीय स्वार्थ नाही, कारण जर आम्हीच महाराष्ट्रातून आमच्यासारखे लोक बेळगावात किंवा सिमाभागत एकीकरण समितीच्या विरोधामध्ये प्रचाराला आलो तर आम्ही महाराष्ट्रात किंवा 105 हुताम्यांना काय तोंड दाखवायचा हा पहिला प्रश्न आणि महाराष्ट्रातून जे नेते कोणत्या पक्षाचे असो प्रमुख सत्ताधारी असतील किंवा अन्य असतील हे जेव्हा बेळगावात येतात आणि एकीकरण समितीच्या विरोधामध्ये प्रचार करतात. आपल्या मराठी उमेदवारांना पाडण्यासाठी फौजफाटा घेऊन येतात. असे करणे म्हणजे सीमाभागावरचा आपला दावा कमजोर करणे असल्याचे म्हणत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला सुरू आहे, तिथे आपल्याला न्याय मिळत नाही आहे, तिथे तो दावा कमजोर होतो. कर्नाटक सरकार ज्या प्रकारचा आपल्या लोकांवरती अत्याचार करतो, दडपशाही करतो त्यांना जास्त बळ मिळेल. आता आपण त्यांना बळ द्यायचं की, आपल्या मराठी माणसांच्या उभे राहायचं, याचा विचार महाराष्ट्रातील येणाऱ्या लोकांनी करायला पाहिजे आणि इतकी बेइमानी करू नये.

महाराष्ट्रातील बड्या नेत्यांनी सीमाभागत प्रचार केला नाही
भारतीय जनता पक्षाचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी अजिबात संबंध नव्हता हे आम्ही मान्य करतो. किंबहुना कोणत्याही लढ्याशी त्यांचा संबंध नव्हता. देशातल्या किंवा स्वातंत्र्य लढा असेल, महाराष्ट्र लढा असेल ते कधी कुठल्या आंदोलनात नव्हते, आम्ही होतो, शिवसेना होती, काँग्रेसचे काही नेते होते, कम्युनिस्ट होते. तरीही गेल्या काही वर्षात आम्ही पाहिले की, भारतीय जनता पक्षाचे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, उत्तमराव पाटील हे महाराष्ट्रातले काही प्रमुख नेत्यांनी कधी सीमाभागात येऊन प्रचार केला नाही. कर्नाटकात गेले, पण सीमाभागात आले नाही. गोपीनाथ मुंडे यांनी वारंवार येणे टाळले. पण गेल्या सात-आठ वर्षामध्ये विष पेरले जात आहे. म्हणून मी काल सीमाभागातील जनतेला आव्हान केले की, तुम्ही असे गप्प बसलात तर महाराष्ट्रातून येणारे नेते एक दिवस तुम्हाला संपवून टाकतील. किमान तुम्ही महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांचा निषेध व्यक्त करा, असे संजय राऊत म्हणाले.