Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश INDIA आघाडीच्या मोठ्या बैठकांना आता पूर्णविराम; समन्वय समिती साधणार 'समन्वय'

INDIA आघाडीच्या मोठ्या बैठकांना आता पूर्णविराम; समन्वय समिती साधणार ‘समन्वय’

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापू लागले आहे. सर्वच पक्षांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या या निवडणुकांसाठी तयार सुरू केली आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधात रणशिंग फूंकत विरोधकांनी इंडिया आघाडी उघडली आहे. या आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या असून, आता चौथी बैठक कुठे होते याकडे लक्ष लागलेले असतानाच आता मात्र, इंडिया आघाडीच्या अशा मोठ्या बैठका होणार नसून, इंडिया आघाडीने मोठ्या बैठकांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, ही इंडिया आघाडी समन्वय समितीच्या माध्यमातून सक्रीय असणार आहे एवढे मात्र खरे.(Big meetings of the INDIA Alliance now come to an end; Coordinating committee will do ‘coordination’)

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापू लागले आहे. सर्वच पक्षांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या या निवडणुकांसाठी तयार सुरू केली असून, सत्तेतील भाजपच्या मित्रपक्षांचा एनडीए आणि विरोधकांनी उघडलेल्या इंडिया आघाडीतील पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तर इंडिया आघाडीच्या पहिल्या पाटणा येथील सभेनंतर बंगळुरू आणि नंतर मुंबईत झालेल्या बैठकीनंतर देशातील राजकारण तापायला सुरुवात झालेली असतानाच याच आघाडीच्या चौथ्या बैठकीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष लागले होते. ही चौथी बैठक भोपाळमध्ये होणार असल्याचे बोलले जात असतानाच मात्र, यानंतर इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठका होणार नाहीत असे जाहीर झाल्याने सत्ताधाऱ्यांनी जणूकाही आता सुटकेचा निश्वासच टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

तर समन्वय समितीच्या बैठका होतील

- Advertisement -

इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठकांना जरी पूर्णविराम लावण्यात आला असला तरी मात्र, मुंबई येथील बैठकीत स्थापन करण्यात आलेल्या समन्वय समितीच्या बैठका मात्र, सातत्याने होणार आहेत. या बैठकांमध्ये इंडिया आघाडीच्या पुढील रणनितीविषयी साधक-बाधक चर्चा होणार असून, त्यानंतरील माहिती आघाडीतील सर्व पक्षप्रमुखांना देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : पंतप्रधानांच्या स्पेशल सिक्युरिटी इंचार्जच्या संचालकाचे निधन; लिव्हरच्या आजाराने होते ग्रस्त

सोशल मीडियावर फाईट देण्यासाठी तयार

- Advertisement -

सध्याचे युग सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते. याच सोशल मीडियाच्या प्रचारातून नरेंद्र मोदी सत्तेत आल्याचे 2014 च्या निकालानंतर अनेकांनी विश्लेषण करताना म्हटले होते. हीच सोशल मीडियाची ताकद ओळखत इंडिया आघाडीने सत्ताधाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सोशल मीडियावरही उतरण्याचा निर्णय घेतला असून, इंडिया आघाडीची एक कॉमन सोशल मीडिया टीम बनवली जाणार आहे. सोशल माध्यमांवर भूमिकेमध्ये समानता असावी आणि सर्व पक्षांना समान भाव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : संसदेच्या विशेष अधिवेशनावरून सोनिया गांधीचं पंतप्रधानांना पत्र; ‘या’ मुद्द्यावर वेधलं लक्ष

लोगोच्या अनावरणाचे घोडे अडकले कुठे?

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्यात आली. मात्र यावेळी इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले नाही. तेव्हा पुढील बैठकीत हे लोगोचे अनावरण होईल असे बोलले जात होते. मात्र, आता मोठ्या बैठकानांच पूर्णविराम देण्यात आला असल्याने इंडिया आघाडीच्या लोगोच्या अनावरणाचे काय? असा प्रश्न पडला आहे.

- Advertisment -