आधार कार्ड ऑनलाइन अपडेटसाठी मोठी बातमी, UIDAI ने वापरकर्त्यांना दिला दिलासा

Adhaar Card Update Online Free |पुढील तीन महिने आधार कार्डधारक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

Aadhaar Card: Now you can make Aadhaar card like credit card; Home delivery for only Rs
प्रातिनिधिक छायाचित्र

Adhaar Card Update Online Free | मुंबई – आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुढील तीन महिने आधार कार्डधारक मोफत अपडेट करू शकणार आहेत. UIDAI ने याबाबत अधिकृत घोषणा केली असून आधार कार्ड अपडेट करण्याचं शुल्क रद्द केलं आहे. फक्त ऑनलाइन अपडेटशनसाठी मोफत शुल्क असणार आहेत. ऑफलाईन अपडेटन करताना ५० रुपये भरावे लागणार आहेत.

पुढील तीन महिने आधार कार्डधारक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. १५ मार्त ते १४ जूनपर्यंत तुम्ही मोफत आधार कार्ड अपडेट करू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जावं लागणार आहे. या संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्ही तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक समाविष्ट केल्यास तुम्हाला ओटीपी विचारला जाईल. ओटीपी समाविष्ट केल्यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करावं लागेल. तिथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा तपशील दिसेल.

हेही वाचा – पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केले का? आयकर विभागाने दिला हा इशारा

पत्ता कसा अपडेट कराल?

  • https://myaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला पत्ता अपडेट करावा लागेल.
  • आधार स्वयं-सेवा अपडेट पोर्टलवर जाऊन पत्ता अपडेट करण्यासाठी पुढे जा पर्यायावर क्लिक करा.
  • आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ओटीपी समाविष्ट करा.
  • ‘proceed to update address ‘ वर क्लिक करा. 12-अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक करा.
    OTP एंटर करा आणि आधार खात्यात लॉगइन करा.
  • ‘update address via address proof’ पर्याय निवडल्यानंतर नवीन पत्ता भरा.
  • ‘Proof of Address’ मध्ये नमूद केलेला निवासी पत्ता भरा.
  • आता, अॅड्रेस प्रूफ म्हणून सबमिट बटणावर क्लिक करा.
  • पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

आधार-पॅन कार्ड लिंक करा

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. तसंच, ज्यांनी गेल्या १० वर्षांत आधार कार्डमध्ये कोणताही बदल केलेला नसेल त्यांनीही आधार कार्ड अपडेट करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.