घरदेश-विदेशPNB ग्राहकांसाठी मोठी बातमी, बचत खात्यातील ग्राहकांच्या व्याजदरात होणार कपात

PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी, बचत खात्यातील ग्राहकांच्या व्याजदरात होणार कपात

Subscribe

बँकेतर्फे खात्यावरील जमा रकमेवर 3 टक्के व्याजदर दिला जातो.

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. येत्या 1 सप्टेंबर पासून पंजाब नॅशनल बँकेच्या व्याजदरात बदल करण्यात येणार असल्याच्या महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार,बचत खात्यामध्ये जमा रकमेवर कपात करण्यात येणार आहे. तसेच बँकेचे नवीन वार्षिक व्याजदर 2.90 टक्के इतके असणार आहे. सध्या बँकेतर्फे खात्यावरील जमा रकमेवर 3 टक्के व्याजदर दिला जातो. पंजाब नॅशनलने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ज्या व्याजदरात बदल करण्यात आला आहे हे नव्या व जुन्या दोन्ही ग्राहकांवर लागू होतील. पंजाब नॅशनल बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक आहे. तसेच देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना बचत खात्यावर वार्षिक 2.70 टक्के व्याजदर आकारण्यात येतो. तसेच कोटक महिंद्रा बँक इंड्सइंड ग्राहकांना बचत खात्यावर वार्षिक 4 ते 6 टक्के व्याजदर देते.

पंजाब नॅशनल बँकेने (PNB)बचत खात्यावरच्या व्याज दरांमध्ये मोठा बदल करत PNB बँक ७ ते १० वर्षांच्या कालावधीत मॅच्युर होणाऱ्या बचत खात्यावर  २.९ टक्क्यांपासून ते ५.२५ टक्क्यांपर्यंत व्याज दर देत आहे. तर ७ ते ४५ दिवसांच्या बचत खात्यावरील रकमेवर २.९ टक्के व्याज दर देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जमा केलेल्या रकमेवर ०.५ टक्के अतिरिक्त व्याज मिळणार आहे. ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत मॅच्योर होणाऱ्या FD वर त्यांना ३.४ टक्क्यांपासून ते ५.७५ टक्के व्याज दर मिळणार आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – पती परमेश्वर ! बायकोने बांधलं नवऱ्यासाठी मंदिर, दररोज करते पतीची पूजा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -