घरदेश-विदेशमोठी बातमी! अमेरिकेतील सर्व्हरमध्ये बिघाड, सर्व विमानांची उड्डाणे रद्द

मोठी बातमी! अमेरिकेतील सर्व्हरमध्ये बिघाड, सर्व विमानांची उड्डाणे रद्द

Subscribe

वॉशिंग्टन – अमेरिकेतील विमानतळ आणि विमान वाहतूक नियंत्रण विभागातील संगणकात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे देशातील सर्व एअरलाईन्सची सर्व उड्डाने पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. यामुळे अमेरिकेतील विमानतळांवर एकच गोंधळ उडाला आहे. अनेक विमाने ग्राऊंडवरच रोखण्यात आली आहेत.

युएस फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) प्रणालीअंतर्गत पायलट आणि इतर उड्डाण कर्मचाऱ्यांना संबंधित धोक्यांविषयी माहिती दिली जाते. तसंच, सामान्य कामजांवरही देखरेख केली जाते. मात्रा, आता याच यंत्रणेतून कोणतीही माहिती पुरवली जात नाहीय. त्यामुळे अमेरिकेतील सर्व विमान सेवा ठप्प झाल्या आहेत. सर्व विमाने ग्राऊंडवरच रोखण्यात आली आहेत. अमेरिकी नागरिक उड्डान नियामकच्या संकेतस्थळानुसार ही माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

अमेरिका चॅनेल एनबीसीला दिलेल्या एका माहितीत एफएएने म्हटलं आहे की, एफएए नोटीस टू एअर मिशन सिस्टमसाठी काम करत आहेत. आम्ही अडचणी वेरिफाय करत आहोत. यासाठी सिस्टमला पुन्हा उघडण्यात येणार आहे. नॅशवनल फ्लाय झोन सिस्टममध्ये बिघाड झाला आहे. अडचणी दूर करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. लवकरच हा बिघाड दुरुस्त करण्यात येईल, असं सांगण्यात येतंय.


अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी ५.३१ वाजता अमेरिकेच्या आतमध्ये आणि बाहेर एकूण ४०० उड्डाणांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही उड्डाणे आता उशिराने पोहोचणार आहेत. दरम्यान, काही वेळापूर्वीच FAA अजूनही आउटेजनंतर नोटिस टू एअर मिशन सिस्टम पूर्णपणे पुनर्संचयित करण्यासाठी काम करत आहे. काही कार्ये पुन्हा लाईनवर येऊ लागली आहेत, राष्ट्रीय एअरस्पेस सिस्टम ऑपरेशन्स मर्यादित आहेत, असं ट्वीट करण्यात आलं आहे.

- Advertisement -

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -