Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश इम्रान खान यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 31 मेपर्यंत अटक टळली

इम्रान खान यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा; 31 मेपर्यंत अटक टळली

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (17 मे) मोठा दिलासा दिलासा दिला आहे. इम्रान खान यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या कोणत्याही खटल्यात त्यांना अटक करण्यावर बंदी घालण्याच्या आदेशात 31  मे पर्यंत अटक टळली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा (IHC) निर्णय सरकारी वकिलाने तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यांची माहिती देण्यासाठी अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

इम्रान खान यांना शुक्रवारी (12 मे) इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अल कादिर ट्रस्ट प्रकरणी इम्रान खान यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर करताना अधिकाऱ्यांना 15 मे पर्यंत देशात कोठेही नोंदवलेल्या कोणत्याही प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यापासून रोखले होते. पण त्यानंतर अटकेच्या भीतीने इम्रान खान यांनी उच्च न्यायालय परिसर सोडला नव्हता. ते शनिवारी लाहोरमधील त्यांच्या घरी परतले. उच्च न्यायालयाने 9 मे रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या परिसरातून इम्रान खान यांना नाट्यमयिरत्या अटक केली होती.

- Advertisement -

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी पीटीआय नेते मलिका बुखारी आणि अली मुहम्मद खान यांची अटक बेकायदेशीर घोषित केली आणि त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. इम्रान खान यांच्या अटकेनंतर देशात झालेल्या हिंसक निदर्शनेनंतर पीटीआय नेत्यांना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याच्या अध्यादेश, 1960 अंतर्गत अटक करण्यात आली होती.

पाकिस्तानमधील हिंसक संघर्षात मृतांची संख्या 10 वर
इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. राजकीय परिस्थितीमुळे पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आणि लाहोरमधील एका कॉर्पस कमांडरच्या घराला आग लावली होती. पोलीस आणि समर्थकांच्या चकमकीत आतापर्यंत मृतांची संख्या 10 वर गेली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने दावा केला की, सुरक्षा कर्मचार्‍यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचे 40 कार्यकर्ते मारले गेले आहेत.

- Advertisement -

इम्रान खान यांच्यावर 100 हून अधिक गुन्हे दाखल
इम्रान खान न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे पीटीआयच्या याचिकेवर सुनावणी करताना त्यांच्याविरुद्ध सर्व खटल्यांचा तपशील न्यायालयाने मागितला होता. त्यानुसार इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानमध्ये 100 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -