Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी इम्रान खान यांना मोठा दिलासा; 2 जूनपर्यंत टळली अटक

इम्रान खान यांना मोठा दिलासा; 2 जूनपर्यंत टळली अटक

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) प्रमुख इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने (ATC) शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. शिवाय, इम्रान खान यांना 2 जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) प्रमुख इम्रान खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने (ATC) शुक्रवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. शिवाय, इम्रान खान यांना 2 जूनपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (Big Relief To Imran Khan Will Not Be Arrested Till June 2 Lahore ATC Decision)

इम्रान खान यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये लाहोरमधील कॉर्प्स कमांडर हाऊसवर हल्ला केल्याचाही समावेश आहे. न्यायालयात पत्रकारांना संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, “गेल्या 35 वर्षांत मी अशी कारवाई कधीच पाहिली नव्हती. सर्व नागरी स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार संपल्यासारखे वाटते. आता फक्त न्यायालये मानवी हक्कांचे रक्षण करत आहेत”.

- Advertisement -

इम्रान खानला निमलष्करी दलाच्या पाकिस्तान रेंजर्सनी 9 मे रोजी IHC परिसरात अटक केली होती. इम्रान खान यांच्या अटकेनंतर संपूर्ण पाकिस्तानमध्ये अशांतता पसरली होती. पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच आंदोलकांनी रावळपिंडी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला आणि लाहोरमधील एका कॉर्पस कमांडरच्या घराला आग लावली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत 10 जणांता मृत्यू झाला होता. पण इम्रान खानच्या पक्षाने हिंसाचारात 40 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात आपल्या पक्षाचे समर्थकही मारले गेल्याचा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, पाकिस्तानमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर लष्कर प्रचंड संतापले आहे. त्यामुळे इम्रान खान यांना पाकिस्तानी लष्कराने दोन पर्याय दिले आहेत. एकतर दुबई, लंडनला जा किंवा आर्मी ऍक्ट अंतर्गत खटल्याला सामोरे जा, अशी माहिती सूत्रांनी  दिली आहे.

पण सध्याच्या परिस्थितीत इम्रान खान परदेशात जाण्यास तयार नाही. त्यामुळे त्यांना आर्मी ऍक्टच्या खटल्याला सामोरे जावे लागू शकते. आर्मी ऍक्ट अंतर्गत 99 टक्के प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्याकडे कोणता पर्याय उरला आहे? इम्रान लष्कराला शरण जाणार की सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा बचावाचा प्रयत्न करतील? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


हेही वाचा – MPSC : तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी घ्या, जयंत पाटलांची मागणी

- Advertisment -