Shraddha Murder Case: मोठा खुलासा! डोकं आणि धड तब्बल सहा महिने ठेवले होते फ्रिजमध्ये

आरोपीने घटनेनंतरच श्रद्धाच्या मृतदेहाचे बहुतांश तुकडे छत्तरपूरच्या जंगलात फेकून दिले होते. तर डोके, धड आणि हाताची बोटे फ्रीजमध्ये तब्बल सहा महिने ठेवली होती. 18 ऑक्टोबर रोजी त्याने मृतदेहाचे हे तुकडे फेकून दिले होते.

shradha was brutally murdered proved in forensic report as bone dna match with father delhi police inquiry

नवी दिल्ली – संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणात ( Shraddha Murder Case) मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी रविवारी मेहरौली जंगलात (Mehrauli Forest) केलेल्या तपासात त्यांना एक कवटी आणि जबडा सापडला आहे. तसंच, अनेक हाडेही जप्त करण्यात आली आहेत. मात्र, पोलिसांना अद्यापही श्रद्धाचे डोके आणि धड सापडलेले नाही. परंतु, त्याने हाडे आणि डोके तब्बल सहा महिने फ्रिजमध्येच ठेवले होते, असा मोठा खुलासा त्याने चौकशीदरम्यान केला आहे. त्यामुळे पोलीस आता त्या दृष्टीने तपास करत आहेत.

हेही वाचा – आफताबने ‘या’ तलावात फेकले होते श्रद्धाचे शीर; दिल्ली पोलीस तलाव करणार रिकामी

पोलीस अजूनही मेहरौलीच्या जंगलात शोध घेत आहेत. पोलिसांना सापडलेली हाडे मानवाची आहेत की अन्य कोणाची हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. जप्त केलेली हाडे श्रद्धा वालकरची असल्याचे निष्पन्न झाल्यास या प्रकरणाचे गूढ उकलण्यास पोलिसांना मदत मिळू शकते. त्यामुळे फॉरेन्सिक अहवालाची सर्वांना प्रतीक्षा आहे.

दक्षिण जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शोध मोहिम सुरू असताना अफताबच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. त्याच्या या कृत्यामुळे पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केलंय. तसंच, तो मानसिक रुग्ण असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. आरोपीने घटनेनंतरच श्रद्धाच्या मृतदेहाचे बहुतांश तुकडे छत्तरपूरच्या जंगलात फेकून दिले होते. तर डोके, धड आणि हाताची बोटे फ्रीजमध्ये तब्बल सहा महिने ठेवली होती. 18 ऑक्टोबर रोजी त्याने मृतदेहाचे हे तुकडे फेकून दिले होते.

दरम्यान, डोके, धड आणि हाताची बोटे सहा महिने फ्रिजमध्ये असताना त्याने फक्त एक-दोनदाच फ्रिज उघडून पाहिले होते. या काळात त्याने फ्रिजमध्ये खाण्यापिण्याचे किंवा इतर कोणतेच पदार्थ ठेवले नाहीत. एक-दोन वेळा फ्रिज उघडून त्याने डोके आणि धड बाहेर काढले होते, असं त्याने चौकशीत सांगितलं. तसंच, डोकं आणि धडाची विल्हेवाट लावण्याकरता त्याने प्रयत्नही केला. त्यासाठी पिशवीत डोके आणि धड टाकून तो इमारतीच्या खाली उतरला. मात्र, कोणाला तरी संशय येईल, म्हणून तो पुन्हा घरी परतला, असंही त्याने सांगितलं. याच काळात त्याची मैत्रीणही घरी येऊन गेली. मात्र, फ्रीज खराब झाला असल्याचं त्याने तिला सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि अफताब मुंबईत ज्या खोलीत भाड्याने राहत होते, ती जागा त्यांनी सोडली नव्हती. श्रद्धा आणि अफताब नवरा-बायको असल्याचं भासवत त्यांनी मुंबईतील ही खोली भाड्याने घेतली होती. फिरायला जातो असं सांगून ते हे दोघे दिल्लीला गेले होते. दिल्लीत राहत असतानाही अफताबला मुंबईच्या खोलीचं भाडं भरावं लागत होतं. त्यामुळे हे घर रिकामे करण्याकरता तो जूनमध्ये मुंबईत परतला. मुंबईतील खोली रिकामी केली, घरातील सामान बाहेर काढले. परंतु, याबाबत त्याने आपल्या आई-वडिलांना काहीही सांगितलं नाही.

शीर फेकले तलावात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफताबने श्रद्धाचं शीर एका तलावात फेकलं आहे. छतरपूर एनक्लेव येथील तलावात शीर फेकण्यात आलं असून यासाठी पोलिसांनी हा संपूर्ण तलाव उपसण्यास सुरुवात केली आहे. या हत्याकांडासाठी वापरण्यात आलंलं हत्यारदेखील अद्याप सापडलेलं नाही. तसंच, हत्येवेळी श्रद्धाने जे कपडे परिधान केले होते, त्याचाही शोध अद्याप लागलेला नसल्याने पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.