घर देश-विदेश चांद्रयान - 3 संदर्भात इस्रोकडून मोठी अपडेट; "...आता काम पूर्ण"

चांद्रयान – 3 संदर्भात इस्रोकडून मोठी अपडेट; “…आता काम पूर्ण”

Subscribe

मुंबई : इस्रोच्या चांद्रयान – 3 ने चंद्रावरील तापमानापासून रोव्हरच्या सर्व माहिती दिली आहे. रोव्हरला दिलेले काम पूर्ण केले आहे, अशी माहिती इस्रोने आज ट्वीट करत मोठी अपडेट्स दिली आहेत. भारताने 23 ऑगस्टला सायंकाळी 6.04 मिनिटाने चांद्रयान – 3 चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग केली. यानंतर भारत हा दक्षिण ध्रुवार पाऊल ठेवणार पाहिला देश झाला आहे.

इस्रोने ट्वीटमध्ये म्हणाले, “रोव्हरला दिलेले काम त्यांनी पूर्ण केले आहे. यात रोव्हरने सुरक्षितपणे पार्क करण्यात आले आहे. आता रोव्हरचा स्लीप मोड सक्रीय करण्यात आला असून एपीएक्सएस आणि एलआयबीएस पेलोड्सही बंद करण्यात आले आहेत. तसेच पेलोड्समधील डेटा लँडरमार्फत पृथ्वीवर पाठवण्यात आला आहे. पुढील सर्योदय 22 सप्टेंबरला होणार आहे. यापूर्वी सूर्य प्रकाश पडेल, अशी सोलर पॅनलची रचना करण्यात आली आहे. रिसिव्हर सुरूच आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – चांद्रयान-3: प्रज्ञान रोव्हरने घेतला विक्रम लॅंडरच पहिला फोटो; इस्रोने केला शेअर

- Advertisement -

हेही वाचा – चांद्रयान-3 ने पाठविली ISRO ला मोठी माहिती; सांगितले- दक्षिण ध्रृवावर किती आहे तापमान…

असा राहला चांद्रयान-3 चा प्रवास

  • 30 ऑगस्टला चांद्रयान – 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर उतलेल्या विक्रम लॅंडरचा पहिला फोटो प्रज्ञान रोव्हर घेतला असून, तो फोटो इस्रोन ट्वीट केला.
  • 24 ऑगस्टला चांद्रयान – 3 यशस्वी लँडिंग झाल्यानंतर पहिला मसेज पाठविला. “भारत मी यशस्वीरित्या माझे ध्येय गाठवले आणि तुम्ही सुद्धा”, असा मेसेज हा चांद्रयान – 3ने पाठविला.
  • 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:40 वाजता विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला.
  • 20 ऑगस्ट रोजी, लँडरने दुसऱ्यांदा डीबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आणि चंद्राच्या अगदी जवळ पोहोचला.
  • 18 ऑगस्ट रोजी, विक्रम लँडर डीबूस्टिंग प्रक्रियेतून गेला, जो यशस्वी झाला.
  • 17 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चांद्रयान-3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले. लँडर चंद्राच्या पृष्ठभागाकडे सरकत आहे.
  • 16 ऑगस्ट रोजी कक्षा बदलून, ते चंद्राच्या सर्वात जवळच्या 100 किमीच्या कक्षेत स्थापित केले गेले.
  • 9 ऑगस्ट रोजी तिसरी कक्षा बदलून 5 हजार किमीच्या कक्षेत प्रस्थापित झाली आणि त्यानंतर 14 ऑगस्टला 1 हजार किमीच्या चौथ्या कक्षेत प्रवेश केला.
  • 6 ऑगस्ट रोजी त्याने दुसऱ्या 20,000 कक्षेत प्रवेश केला.
  • 5 ऑगस्ट रोजी या वाहनाने चंद्राच्या पहिल्या 40 हजार किमीच्या कक्षेत प्रवेश केला.
  • 1 ऑगस्ट रोजी चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढून चंद्राच्या कक्षेकडे वळले.
  • 15 जुलै रोजी, इस्रोने पृथ्वीच्या दिशेने अंतराळ यानाला पुढे नेण्यासाठी पहिली प्रक्रिया पूर्ण केली.
  • इस्रोने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 प्रक्षेपित केले आणि ते पृथ्वीभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत टाकले.

- Advertisment -