घरक्राइमBihar Accident : जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीने पाच जणांना चिरडले, बालकासह तिघांचा मृत्यू

Bihar Accident : जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीने पाच जणांना चिरडले, बालकासह तिघांचा मृत्यू

Subscribe

पाटणा : बिहारमध्ये मधेपुरा जिल्हाधिकाऱ्यांच्या भरधाव कारखाली चिरडून तीन जणांचा मृत्यू तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. फुलपारस पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज, मंगळवारी सकाळी ही घटना घडली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यासह गाडीतील इतरांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी गाडीची तोडफोड करत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ रोखून धरली होती.

हेही वाचा – ‘BOSS असावा तर असा’; विश्वचषकातील भारताच्या पराभवातून सावरण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिली सुट्टी

- Advertisement -

पाच दिवसांच्या सुट्टीनंतर मधेपुराकडे जात असताना जिल्हाधिकारी विजय प्रकाश मीणा यांची भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा गाडी डिव्हायडरला धडकली आणि त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी, रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या मजुरांना गाडीची धडक बसली. यावेळी एक मजूर, महिला आणि बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जखमींना दरभंगा मे़डिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये (DMCH) दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी गाडीत जिल्हाधिकारी, चालक, अंगरक्षक आणि एक मुलगी होती. या घटनेनंतर एक दुचाकी तेथे आली आणि त्यांना घेऊन गेल्याचे सांगण्यात येते. तथापि, आपण त्या गाडीत नव्हतो, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

- Advertisement -

सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गाडीने प्रथम महिला आणि मुलाला धडक दिली आणि नंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 57वर काम करणाऱ्या मजुरांना धडक दिली. हे मजूर राजस्थानचे रहिवासी आहेत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली. या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात 27 वर्षीय गुरिया देवी आणि तिचा 7 वर्षांचा मुलगा देखील सामील आहे. डीएमसीएचमध्ये मृत्यू झालेल्या मजुराचे नाव अशोक सिंग असे असून तोही राजस्थानचा होता. या अपघातानंतर लगेचच संतप्त गावकरी जमा झाले, त्यांनी इनोव्हा गाडीची तोडफोड केली. आंदोलकांनी इनोव्हातील प्रवाशांना अटक करून पीडितांना पुरेशी भरपाई देण्याची मागणी केली. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रोखून धरल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -