असदुद्दीन ओवैसींना मोठा फटका; ४ आमदारांचा पक्षाला रामराम, ‘आरजेडी’त केला प्रवेश

'एआयएमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांना मोठा फटका बसला आहे. एआयएमआयएमच्या (AIMIM) ५ आमदारांपैकी ४ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. एआयएमआयएमच्या ४ आमदारांनी 'आरजेडी' पक्षात (राष्ट्रीय जनता दल) पक्षात प्रवेश केला आहे.

Prince Tuli has claimed that Asaduddin Owaisi of MIM is the grandson of Tulsirama
एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी तुलसीरामाचे पणतू, प्रिन्स तुलीचा दावा

‘एआयएमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (asaduddin owaisi) यांना मोठा फटका बसला आहे. एआयएमआयएमच्या (AIMIM) ५ आमदारांपैकी ४ आमदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. एआयएमआयएमच्या ४ आमदारांनी ‘आरजेडी’ पक्षात (राष्ट्रीय जनता दल) पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे बिहारमध्ये (Bihar) पुन्हा एकदा आरजेडी पक्षाला बळ मिळाणार आहे. (bihar asaduddin owaisi party aimim four mlas joins tejashwi yadav rjd)

‘एआयएमआयएम’च्या चार आमदारांनी प्रवेश केल्याची माहिती बुधवारी स्वत: तेजस्वी यादव यांनी दिली. शाहनवाज, इजहार, अंजार नाइयनी आणि सय्यद रुकनुद्दीन अशी या आमदारांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव हे एआयएमआयएमच्या चार आमदारांसह विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा यांच्या चेंबरमध्ये स्वत: गाडी चालवत गेले. तिकडून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सांगितले की, चार आमदार आरजेडीमध्ये सामील झाले आहेत. मात्र, एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान यांनी ओवेसींची बाजू सोडलेली नाही. याशिवाय चारही आमदार आरजेडीमध्ये सामील झाले आहेत.

याबाबत विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत. आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत. एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान यांनी पक्ष सोडला नसून, चार आमदारांच्या जाण्याने तेजस्वी यादव यांनी ओवेसींच्या पक्षाला मोठा धक्का दिला आहे. दुसरीकडे, पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव याबाबत काय बोलतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

यशवंत सिन्हा यांना ‘एआयएमआयएम’चा पाठिंबा

येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक (presidential election) होणार आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार असलेले यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना ‘एआयएमआयएम’चा (AIMIM) पाठिंबा असल्याची घोषणा असदुद्दीन ओवैसी (aimim chief asaduddin owaisi) यांनी केली आहे. ओवैसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाठींबा देण्याची घोषणा केली.


हेही वाचा – पटोलेंच्या सुपीक डोक्यातील नापीक कल्पनांना जनता भीक घालत नाही, मुनगंटीवारांचा टोला