घरताज्या घडामोडीBihar Election 2020: भाजपशी दोन हात करायला शिवसेनेची २० जणांची टीम तयार

Bihar Election 2020: भाजपशी दोन हात करायला शिवसेनेची २० जणांची टीम तयार

Subscribe

उत्तरेतील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणाऱ्या बिहार विधानसभेचे रणधुमाळी सुरु आहे. विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमारांची जदयू, पासवान यांची लोजप आणि भाजप आपापल्यापरिने जास्तीत जास्त जागा काबीज करण्याचा प्रयत्नात आहेत. मात्र या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आणलाय शिवसेनेने. बिहार विधानसभेच्या ५० जागा लढविणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडविण्यासाठी आता शिवसेनेकडून २० जणांची स्टार प्रचारकांची टीम तयार करण्यात आली आहे. त्याची यादी आज जाहीर करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी ही २० जणांची टीम तयार करण्यात आली आहे. सुभाष देसाई, संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, कौशलेंद्र शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी आणि अशोक तिवारी

- Advertisement -

shiv sena star campainer list

शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे स्टार प्रचारकांची यादी सोपवली आहे. सुशांत सिंह प्रकरणात बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेच्या विरोधात आघाडी उघडली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील भाजपचे नेते देखील या प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारवरच बोट दाखवत होते. या सर्व प्रकरणाचा वचपा शिवसेनेचे प्रचारक बिहार निवडणुकीच्या प्रचारात काढतात का? हे पाहावे लागेल.

- Advertisement -

बिहार निवडणुकीचे वेळापत्रक

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्याचे ३ नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तिनही टप्प्यांचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -