Bihar Election: जिंकलेल्या उमेदवारांना पराभूत घोषित केलं; राजदचा खळबळजनक आरोप

tejashwi yadav
तेजस्वी यादव

बिहार निवडणुकीच्या मतमोजणीवरुन तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीएवर गंभीर आणि खळबळजनक आरोप लावले आहेत. निवडणुकीच्या निकालत एनडीएकडून अफरातफर केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरजेडीच्या जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा दावा पक्षातर्फे करण्यात आला आहे. सुशील मोदी आणि नीतीश कुमार हे निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचेही आरजेडीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

राजदने ट्विटरद्वारे हा आरोप केला आहे. त्यांनी ११९ उमेदवारांची यादीच ट्विट करत हे उमेदवार जिंकले असल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले होते. त्यांना विजयाच्या शुभेच्छाही दिल्या. मात्र आता प्रमाणपत्र दिले जात नाही आहे. आता तुम्ही पराभूत झाल्याचे सांगितले जात आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील जिंकल्याचे दाखविण्यात आले होते. लोकशाहीत अशी लूट चालणार नाही, असा आरोप राजदने लावला आहे.

निवडणूक आयोगाचे सचिव उमेश सिन्हा यांनी मात्र राजदचे आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणूक आयोग हा कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. आयोगाचे सर्व अधिकारी आणि यंत्रणा बिहारचा निकाल जाहीर करण्याचे काम चोखपणे करत आहे, असे त्यांनी सांगितले.