घरताज्या घडामोडीBihar Election : भाजप-जदयूचं अखेर ठरलं; दीर्घ चर्चांनंतर फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब!

Bihar Election : भाजप-जदयूचं अखेर ठरलं; दीर्घ चर्चांनंतर फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब!

Subscribe

येत्या २८ ऑक्टोबर रोजी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Bihar Assembly Election) भाजप आणि संयुक्त जनता दल अर्थात Janata Dal United यांच्यामधल्या जागावाटपाचं गुऱ्हाळ अखेर संपलं असून त्यातून जागावाटपाचा जवळपास ५०-५० टक्के फॉर्म्युला समोर आला आहे. यानुसार बिहारमधल्या २४३ जागांपैकी १२१ जागा भाजप (BJP) लढवणार असून १२२ जागा नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला मिळणार आहेत. जनता दलाच्या कोट्यातूनच जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आम मोर्चा अर्थात HAM ला ७ जागा देण्याचं जागावाटपाच्या बैठकीत ठरलं आहे. त्यामुळे वास्तविक जेडीयुच्या (JDU) वाट्याला ११५च जागा आल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावावर एकमत झाल्याचं खुद्द नितीशकुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाजपच्या कोट्यातून देखीस मुकेश साहनी यांच्या विकास इन्सान पार्टी अर्थात VIP या पक्षाला काही जागा सोडाव्या लागणार आहेत. मात्र, त्या जागा नक्की किती असतील, याविषयी अद्याप स्पष्टता आलेली नाही. दोन्ही पक्ष आपापसांत चर्चा करून त्याचा निर्णय घेतील असं सांगितलं जात आहे.

महायुतीचंही जागावाटप निश्चित

एकीकडे NDA चं जागावाटपाचं गणित बसलं असताना दुसरीकडे महायुतीमध्ये देखील जागावाटप निश्चित झालं आहे. त्यात RJD १४४ जागा, काँग्रेस ७० जागा तर डावे पक्ष २९ जागा लढवणार आहेत. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने देखील उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे.

- Advertisement -

तीन टप्प्यांत होणार मतदान

येत्या २८ ऑक्टोबरपासून बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तीन टप्प्यांमध्ये हे मतदान होणार असून ९ नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे तर १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोरोना काळात भारतात या पहिल्याच निवडणुका होणार असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून देखील कोरोनासंदर्भातल्या सर्व उपाययोजना आणि काळजी घेऊनच ही पूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -