घरदेश-विदेश१० नव्हे तर आम्ही २० लाख नोकऱ्या देऊ, बिहारमध्ये तेजस्वी यादवांची मोठी...

१० नव्हे तर आम्ही २० लाख नोकऱ्या देऊ, बिहारमध्ये तेजस्वी यादवांची मोठी घोषणा

Subscribe

१० नव्हे तर आम्ही २० लाख नोकऱ्या देऊ, अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी केली आहे. ते गांधी मैदानमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित होते.

पाटणा : स्वातंत्र्य दिनानिमित्त पाटण्यातील गांधी मैदानावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी नोकरी आणि रोजगार क्षेत्राबाबत मोठी घोषणा केली. नितीश कुमार म्हणाले की, तरुणांना सरकारी असो वा खासगी नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आमच्या मनात दहा लाख नोकऱ्या देण्याचे आहे, ते वीस लाखापर्यंत जाऊ शकते. याबाबत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, ही ऐतिहासिक घोषणा आहे.

तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार यांनी गांधी मैदानातून 10 लाख नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले आहे. ही मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवली जाईल. आज बिहारच्या प्रत्येक तरुणाची अपेक्षा होती, ती इच्छा आम्ही मिळून पूर्ण करत आहोत. यापेक्षा मोठे व्यासपीठ कोणते असू शकते, मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन युवकांना नोकऱ्या देऊ, अशी घोषणा गांधी मैदानातून केली आहे. बेरोजगारी दूर करणे हा आमचा सर्वात मोठा मुद्दा आहे. त्या आधारे आम्हाला जनादेश मिळाला. हाच मुद्दा आहे. तेजस्वी यादव यांनी गांधी मैदानावर या गोष्टी सांगितल्या.

- Advertisement -

तेजस्वी यादव यांनी केले ट्विट  –

- Advertisement -

तेजस्वी यादव यांनी सोमवारी गांधी मैदानावरील मुख्यमंत्र्यांच्या भाषणात रोजगाराबाबत केलेल्या घोषणेबद्दल ट्विट केले आणि लिहिले-आदरणीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांची 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त गांधी मैदान, पाटणा येथून ऐतिहासिक घोषणा :- 10 लाख नोकऱ्यांनंतर इतर व्यवस्थेतूनही 10 लाख अतिरिक्त नोकऱ्या दिल्या जातील.जज्बा है बिहारी जुनून है बिहार उत्तम बिहार का सपना करना है साकार, असे ट्वीट त्यांनी केल आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -