घरताज्या घडामोडीबिहारचे DGP गुप्तेश्वर पांडे यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती; विधानसभा लढविणार असल्याची चर्चा

बिहारचे DGP गुप्तेश्वर पांडे यांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती; विधानसभा लढविणार असल्याची चर्चा

Subscribe

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे (Gupteshawar Pandey) यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या सरकारने हा राजीनामा मंजूर केला आहे. विशेष म्हणजे गुप्तेश्वर यांच्या निवृत्तीला आणखी काही असताना देखील त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे ते बिहार विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा बिहारच्या राजकारणात रंगली आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात पांडे यांनी सुशांत बिहारी असून त्याच्यावर अन्याय झाला असल्याची भूमिका मोठ्या पोटतिडकीने मांडली होती. एका वृत्तवाहिनीवरील पॅनल चर्चेत त्यांनी बिहारी अस्मितेचा मुद्दा जोरजोरात मांडला होता. तसेच सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंग प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे दिल्यानंतर पांडे यांनी मीडियाशी बोलताना रिया चक्रवर्तीची औकात काढली होती. तेव्हापासूनच ते राजकारणात आज ना उद्या उतरतील अशी अटकळ बांधली जात होती.

Bihar DGP Gupteshwar pande resignation

- Advertisement -

कोण आहेत गुप्तेश्वर पांडे?

गुप्तेश्वर पांडे हे १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जानेवारी २०१९ मध्ये त्यांना बिहार पोलीस महासंचालक पदी नियुक्ती देण्यात आली होती. महासंचालक पदाचा त्यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत होता. मात्र मंगळवारी अचानक त्यांनी कार्यकाळ पुर्ण होण्याआधीच स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या अर्जावर तातडीने कार्यवाही देखील झाली.

३३ वर्षांच्या सेवेत त्यांनी बिहारच्या अनेक जिल्ह्याचा आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला. DIG, IG आणि ADG पद भूषविल्यानंतर त्यांच्याकडे DGP पद देण्यात आले होते. त्यांच्या अचानक निवृत्तीमुळे आता सिव्हिल डिफेन्स आणि फायर सर्व्हिसेसचे डीजी संजीव कुमार सिंघळ यांना पुढचे आदेश येईपर्यंत प्रभारी DGP पदाचा कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -