घरदेश-विदेशBihar Election Update : पहिल्या टप्प्यातलं मतदान संपलं; ७१ जागांसाठी झालं Voting!

Bihar Election Update : पहिल्या टप्प्यातलं मतदान संपलं; ७१ जागांसाठी झालं Voting!

Subscribe

गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरू असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाचा (Bihar Assembly Election) पहिला टप्पा (Phase I) आज पार पडला आहे. आज मतदानाच्या पहिल्या टप्प्यात बिहार विधानसभेतल्या ७१ जागांसाठी मतदान पार पडलं. यामध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५२% मतदान झालं होतं. तुलनात्मकदृष्ट्या विचार करता हे प्रमाण कमी असल्याचं दिसून येतं. गेल्या विधानसभा निवडणुकीत अर्थात २०१५मध्ये पहिल्या टप्प्यात पूर्ण दिवसभरात ५३.५४ टक्के मतदान झालं होतं. तर त्याआधीच्या म्हणजेच २०१०च्या निवडणुकांमध्ये हे प्रमाण ५०.६७ टक्के इतकं कमी होतं. मतदानादरम्यान बिहारच्या भोजपूरमधल्या शाहपूर विधानसभा मतदारसंघात मतदानादरम्यान झालेल्या हिंसक घटनेमुळे आजच्या मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं.

१ हजार ६६ उमेदवार रिंगणात

पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या आकडेवारीचा विचार केला असता, या टप्प्यात बिहारच्या एकूण १६ जिल्ह्यांमध्ये मतदान झालं. ७१ जागांसाठी तब्बल १ हजार ६६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. आज मतदान करणाऱ्या मतदारांची एकूण संख्या २ कोटी १४ लाख इतकी होती. यामध्ये १ कोटी १२ लाख पुरूष तर १ कोटी १ लाख स्त्रिया होत्या. याशिवाय, ५९९ तृतीयपंथी मतदार देखील होते. या एकूण मतदारांपैकी आज ५२ टक्के मतदारांनी मतदान केलं आहे.

- Advertisement -

३ हजार मतदारांचा बहिष्कार

शाहपूरच्या सहजौली गावात बूथ कॅप्चरिंगची एक घटना घडली. यामध्ये दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली. या हाणामारीत ६ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, एकीकडे अशा प्रकारे हाणामारीमुळे हिंसा पाहायला मिळाली असताना दुसरीकडे लखीसरायच्या बालगुदर आणि भोजपूरच्या तरारी या दोन मतदारसंघांमध्ये तब्बल ३ हजाराहून जास्त लोकांनी मतदानावर बहिष्कार घातल्याचं पाहायलं मिळालं. या भागात रस्ते आणि शाळाच नसल्यामुळे मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकून आपला रोष व्यक्त केला आहे.

सापडले जिवंत IED!

दरम्यान, दिवसभरात अनेक ठिकाणी घडलेल्या चुका किंवा गैरकृत्यांमुळे गोंधळ झाल्याचं चित्र देखील निर्माण झालं होतं. अनेक पोलिंग बुथवर गोंधळाचं वातावरण होतं. गयाच्या एका मतदारसंघात तर चक्क मतदाराच्या बोटावर लावलेली शाईच काही सेकंदात गायब झाली! सकाळी मतदान सुरू होण्याच्या आधी औरंगाबादच्या बालूगंजमध्ये दोन आयईडी मिळाल्याने भितीचं वातावरण पसरलं होतं. सीआरपीएफनं लागलीच परिसरात सर्च ऑपरेशन करून हे आयईडी डिफ्युज केले. हा भाग नक्षलग्रस्त असल्यामुळे या भागात सकाळपासूनच सीआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -