घरताज्या घडामोडीBihar Election Results LIVE : एनडीए - महआघाडीत काँटे की टक्कर

Bihar Election Results LIVE : एनडीए – महआघाडीत काँटे की टक्कर

Subscribe

बिहार विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे अजुनही स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत ७४ जागांचे निकाल जाहीर झाले असून त्यापैकी भाजपने २२, आरजेडी २०, जेडीयु १३, काँग्रेस ७, सीपीआय ५ आणि इतर पक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. एनडीएला १२६ जागांवर आघाडी मिळाली आहे तर महाआघाडी ११० जागांवर पुढे आहे.

- Advertisement -

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीची घसरण झाली आहे. सुरूवातीला १२४ जागांवर पुढे असलेली महाआघाडी सध्या १०४ जागी पुढे आहे. दरम्यान, निकालावर राष्ट्रीय जनता दलानं भाष्य केलं आहे. “आम्ही सर्व मतदारसंघातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत आणि सर्व जिल्ह्यांमधून मिळालेल्या माहितीप्रमाणे निकाल आमच्या बाजूनेच आहे. रात्री उशिरा मतमोजणी संपेल. महाआघाडीचं सरकार येणार हे निश्चित आहे. बिहारने सत्तांतर केलं आहे. सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्रावरच राहावं,” असं राजदने म्हटलं आहे.

 

- Advertisement -

बिहारमध्ये RJD सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर

बिहारमध्ये कलांनुसार एनडीएची आघाडी कायम असून राजद सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर असल्याचे चित्र दिसतंय. तर एनडीए १२३ तर महागठबंधन ११२ जागांवर पुढे आहे.


NDA ला स्पष्ट बहुमत मिळणार?; रात्रीपर्यंत अंतिम निकाल येणार
बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. सुरुवातीच्या तासाभरात महाआघाडीने जोरदार मुसंडी मारली. मात्र, हे कल हळूहळू बदल गेले. दुपारी तीनपर्यंत एनडीएने महाआघाडीला पिछाडीवर टाकत आघाडी घेतली. यात एका ठिकाणी विजयी तर ७६ ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. तर जदयू २ ठिकाणी विजयी तर ४० ठिकाणी पुढे, विकसनशील इन्सान पार्टी ५ आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा ३ जागेवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी सध्या १०५ जागांवर आघाडी आहे. राजद एका ठिकाणी विजयी तर ६८ उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेसने १८, तर डाव्या पक्षांनी १८ जागांवर आघाडी घेतली आहे. बसपा आणि एमआयएमचे प्रत्येकी दोन उमेदवार आघाडीवर आहेत. बहुमतांसाठी १२२ जागांची आवश्यकता असून, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मात्र, अंतिम निकालानंतर हेच चित्र कायम राहणार का हा प्रश्न आहे.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार आता सध्या २४३ पैकी ४३ जागा अशा आहेत जिथे दोन उमेदवारांच्या मतांमध्ये केवळ १ हजार मतांचे किंवा त्यापेक्षा कमी अंतर आहे. ८० टक्के मतांची मोजणी अजून व्हायची आहे.


निवडणूक आयोग म्हणजे भाजप आयोग, काँग्रेसचा आरोप.


बिहार निवडणुकीत जवळपास ४.१० कोटी मतदान झाले. त्यापैकी ९२ लाख मतांची मोजणी आतापर्यंत झाली आहे. यापूर्वी मतमोजणीचे २५ ते २६ फेऱ्या होत असत. परंतु यंदा सुमारे ३५ फेऱ्या होतील. त्यामुळे मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरु राहिल, अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच आर श्रीनिवास यांनी दिली.


आताच हाती आलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२७ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप ७३ जागा, जदयू ४७, लोक जनशक्ती पार्टी ४, विकसनशील इन्सान पार्टी ७ जागांवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०० जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६३, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहेत.


बिहारमध्ये आज मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या काही फेऱ्यांमध्ये महाआघाडीने मोठी झेप घेतली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. आताच हाती आलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२५ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप ७० जागा, जदयू ४८, विकसनशील इन्सान पार्टी ६, तर हिंदुस्तानी अवाम मोर्चा एका जागेवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६२, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहेत.


मतमोजणीच्या काही फेऱ्या पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या माहिती प्रमाणे २४३ जागांपैकी १६१ जागांचे कल हाती येताना दिसत आहेत. यात एनडीए ८१ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजप ४२, जदयू ३४, विकसनशील इन्सान पार्टी ५ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाआघाडी ७५ जागांवर आघाडीवर आहे. यात राजदने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस १३ आणि डावे ११ जागांवर आघाडीवर आहेत. बसपा एका जागेवर आघाडीवर आहे. लोजपा दोन, एमआयएमआयएम आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे.


बिहारमध्ये तेजस्वी पर्वाला सुरु होण्यास हरकत नाही; संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले,”निकाल पूर्ण यायचे आहेत. जे कल पाहिले आहेत. त्यावरून एका तरुण नेत्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन ताकत उभी केली आहे. आता अटीतटीची लढत आहे. मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल, तेव्हा लोक जंगल राज विसरलेले असतील आणि मंगलराज सुरू झालेले असेल,” असे संजय राऊत म्हणाले.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरूवातीच्या काही तासांतच राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महाआघाडीने तब्बल ९५ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप-जदयू प्रणित एनडीए ७७ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहे.


विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पाटणातील मतमोजणी केंद्रावरील ही काही दृश्य.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून आज निवडणुकीचा निकाल लागणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील १५ वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. मात्र, बिहारमध्ये सत्तांतर होणार असल्याचे चित्र आहे. बिहार मतमोजणीला सुरुवात झाली असून नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -