घरदेश-विदेशBihar Floor Test: ...तर बिहारमध्ये होऊ शकते मोठी खेळी; नितीश कुमारांचे फासे उलटे पडणार?

Bihar Floor Test: …तर बिहारमध्ये होऊ शकते मोठी खेळी; नितीश कुमारांचे फासे उलटे पडणार?

Subscribe

बिहारमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व पक्षातील आमदारांना कोणालाही भेटू दिले जात नाही. आमदारांवर पाळत ठेवण्यात आली आहे.

पाटणा : फ्लोर टेस्टपूर्वी बिहारमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. काँग्रेसने आपले आमदार हैदराबादला पाठवले आहेत. दुसरीकडे भाजपही सावध झाला आहे. बिहारमधील बोधगया येथील महाबोधी हॉटेलमध्ये भाजप आमदार ठेवण्यात आले आहेत तर आरजेडीचे आमदार माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी आहेत. अशातच तेजस्वी यादवांनी खेळी केली तर बिहारमध्ये मोठा उलटफेर होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Bihar Floor Test so there can be a big game in Bihar Nitish Kumars dice will fall upside down)

बिहारमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्व पक्षातील आमदारांना कोणालाही भेटू दिले जात नाही. आमदारांवर पाळत ठेवण्यात आली आहे. राज्यात जिल्हा अधिकाऱ्यांनाही कार्यक्रमस्थळी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षणस्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि राजदचे सर्व नेते बिहारमध्ये मोठी ‘खेळी’ खेळणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने भाजपकडून सावध पावले उचलली जात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Ganpat Gaikwad : गणपत गायकवाडांचा मुलगा अद्यापही बेपत्ता; रंजित यादवला 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

आरजेडीच्या नेत्याचं मोठं विधान

राजकीय हालचाली दरम्यान आरजेडीचे आमदार अख्तरुल इस्लाम म्हणाले की, फक्त आरजेडीच नाही तर जेडीयू आणि भाजपच्या आमदारांचाही तेजस्वी यादव यांच्यावर विश्वास आहे. जर पक्षादेश काढला नाही तर 243 सदस्यांच्या सभागृहात 200 आमदार तेजस्वी यादव यांना पाठिंबा देतील. ते लोक तेजस्वी यादव यांना ओळखतात आणि त्यांचे काम पाहिले आहे. रविवारी RJD आमदार आणि महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली. त्यानंतर सर्व आमदारांना तेजस्वी यांच्या निवासस्थानी थांबवण्यात आले. फ्लोअर टेस्ट होईपर्यंत सर्व 79 आमदार त्यांच्या निवासस्थानी राहतील. या काळात आमदारांना फोन न वापरण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Vijay Wadettiwar : परीक्षा उत्तीर्ण तरीही नियुक्तीस टाळाटाळ; वडेट्टीवारांचा कृषिमंत्र्यांवर निशाणा

सात आमदारांवर खेळी अवलंबून

243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा 122 आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 122 आमदारांचा पाठिंबा लागणार आहे. नितीश कुमार यांनी 128 आमदारांच्या पाठिंब्याची चर्चा केली आहे. त्यांच्याकडे बहुमतापेक्षा फक्त 6 आमदार जास्त आहेत, तर महाआघाडीकडे 115 आमदार आहेत, त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी 7 आमदारांची गरज आहे. त्यामुळे खेळ या सात आमदारांवर अवलंबून आहे जे राज्यात मोठा बदल घडवू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -