Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुख्याध्यापक आणि शिक्षिकेत जोरदार हाणामारी, VIDEO तुफान व्हायरल

मुख्याध्यापक आणि शिक्षिकेत जोरदार हाणामारी, VIDEO तुफान व्हायरल

Subscribe

बिहारची राजधानी पाटणामध्ये एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिका आणि शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही हाणामारी विद्यार्थ्यांसमोरच झाली. या दोघी एकमेकींना शिव्या देत थपडा, लाथा मारत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेची खिडकी लावण्यावरून या दोन शिक्षकांमध्ये वाद सुरू झाला. हे प्रकरण बिहारमधील बिहटा प्रखंड येथील सरकारी शाळेचा आहे. आपापसातील वादावरून शाळेच्या मुख्याध्यापिका कांती कुमारी आणि शिक्षिका अनिता कुमारी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. हा वाद इतक्या टोकाला गेला होता की, दोघांनी एकमेकांना लाथा, बुक्के आणि चपलेनंही मारलं. यानंतर काही लोकांनी मध्यस्थी करत त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

दरम्यान, प्रखंड शिक्षण पदाधिकारी नवेष कुमार यांनी दोन्ही शिक्षिकांमध्ये काही वैयक्तिक वाद होता असं म्हटलं. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच पुढील कारवाई देखील केली जाणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : Important Days in June 2023 : जून महिन्यात ‘हे’ दिवस आहेत खास; जाणून घ्या कोणते?


 

- Advertisment -