Corona Vaccine: ११ वेळा लस घेणाऱ्या ८४ वर्षीय वृद्धावर FIR दाखल, लवकरच होणार अटक

Bihar man who took 11 Covid jabs booked for cheating
Corona Vaccine: ११ वेळा लस घेणाऱ्या ८४ वर्षीय वृद्धावर FIR दाखल, लवकरच होणार अटक

११ वेळा लस घेतल्यामुळे चर्चेत आलेले बिहाराच्या मधेपुरा जिल्ह्यातील ८४ वर्षीय ब्रह्मदेव मंडल नावाचे रहिवाशी लवकरच अटक होणार आहेत. ब्रह्मदेव मंडल यांच्याविरोधात मधेपुराच्या पुरैनी ठाण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनय कृष्ण प्रसाद यांनी तक्रार केल्यानंतर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे. आता या वृद्ध व्यक्तीला अटक करण्यासाठी कारवाई सुरू आहे.

ब्रह्मदेव मंडलविरोधात आयपीसी कलम १८८, ४१९, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला आहे, ते अजामीनपात्र आहेत. सध्या ब्रह्मदेव मंडल यांचे वय पाहून अटक केल्यानंतर जामीन मिळू शकतो.

दरम्यान ब्रह्म देव मंडल यांनी कोरोना लसीकरण मोहीमेमध्ये आधार कार्ड किंवा मतदान कार्डचा वापर करून आतापर्यंत ११ वेळा लस घेतली आहे. याबाबतची माहिती मंडल यांच्याकडे सविस्तर आहे. मंडल यांनी सर्वात पहिल्यांदा लसीचा डोस १३ फेब्रुवारी २०२१ घेतला होता. मग ३० डिसेंबर २०२१ पर्यंत त्यांनी ११ वेळा लसीचा डोस घेतला. त्यांनी कधी-कधी लस घेतली याची वेळ, तारीख यांची नोंद त्यांच्याकडे आहे.

ब्रह्मदेव मंडल यांनी दावा केला आहे की, ११ वेळा लस दिल्यानंतर काही गंभीर आजारापासून त्यांची सुटका झाली आहे. मंडल हे पोस्ट विभागातील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. ज्याप्रकारे त्यांनी गेल्या १ वर्षात ११ वेळा कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे, यामुळे आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.


हेही वाचा – Omicron Variant: कोरोनातून लवकर बरे व्हायचेय, तर ‘या ‘५ गोष्टींचे सेवन करा