(Bihar News) पाटणा : बिहारसारख्या राज्यात ‘आंधळं दळतंय कुत्रं पीठ खातंय’ अशी परिस्थिती आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. तिथे एका शिक्षकालाच प्रसूती रजा (Maternity leave) दिल्याचा अजीब प्रकार समोर आला आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यशैलीवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. (‘Maternity leave’ given to a male teacher in Bihar)
वैशाली जिल्ह्यातील महुआ ब्लॉकमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हसनपूर सरकारी हायस्कूलमध्ये बिहार लोकसेवा आयोगाने (BPSC) नियुक्त केलेले शिक्षक जितेंद्र कुमार सिंह यांनी डिसेंबर महिन्यात 10 दिवसांची सुट्टी घेतली. शिक्षण विभागाच्या ई-शिक्षा कोष पोर्टलवर संबंधितांच्या सुट्ट्या अपलोड केल्यावर त्यात शिक्षक जितेंद्र कुमार सिंह यांची प्रसूती रजा दर्शविण्यात आली होती.
बिहार शिक्षा विभाग ने फिर एक बार फिर कमाल कर दिया है,BPSC शिक्षक को प्रेग्नेंट बताते हुए maternity leave दे दिया है #Bihar pic.twitter.com/OWbPqe3wuW
— Mukesh singh (@Mukesh_Journo) December 24, 2024
सरकारी नोंदीनुसार, शिक्षक जितेंद्र कुमार हे 1 ते 10 डिसेंबरपर्यंत प्रसूती रजेवर होते. प्रसूती रजा फक्त महिला कर्मचारी आणि शिक्षिकांना उपलब्ध आहे. गर्भवती असताना महिला कर्मचारी प्रसूती रजा घेऊ शकतात. कोणत्याही विभागातील पुरुषांना प्रसूती रजा दिली जात नाही. मात्र, वडील झाल्यानंतर मुलांची काळजी घेण्यासाठी त्याला पितृत्व रजा मिळते.
हेही वाचा – Narayan Rane on Nanar Refinery : कंपन्या येणार असतील तर…, नाणार रिफायनरीबाबत राणेंचे मोठे विधान
सध्या बीपीएससीकडून देण्यात आलेल्या जितेंद्र कुमार यांच्या ‘प्रसूती रजे’चा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बाब उघडकीस येताच अधिकारी चिंतीत झाले असून, शिक्षण विभाग डॅमेज कंट्रोल करण्यात गुंतला आहे. ‘तांत्रिक दोषामुळे हा प्रकार घडला आहे. सरकारी संकेतस्थळावरील पुरुष शिक्षकाच्या कॉलममध्ये चुकून प्रसूती रजेची नोंद झाली आहे. ही चूक लवकरच दुरुस्त केले जाईल, असे महुआच्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (बीईओ) अर्चना कुमारी यांनी सांगितले. (Bihar News : ‘Maternity leave’ given to a male teacher in Bihar)
हेही वाचा – Kumar Vishwas on Baba Ramdev : …अन्यथा मीठ सडले असते, कुमार विश्वासांचा बाबा रामदेवांवर निशाणा