Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली बिहार मुख्यमंत्री पदाची शपथ

नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली बिहार मुख्यमंत्री पदाची शपथ

Subscribe

बिहारच्या राजकारणात बुधवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बिहारच्या राजभवानात दुपारी 2 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला.

नितीशकुमार 2000 मध्ये पहिल्यांदा सात दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 22 वर्षांच्या प्रवासात त्यांनी सहा वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी 8 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हा एक मोठा विक्रम आहे. देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेका यांना आतापर्यंत अनेकवेळा शपथ घेता आली नाही.

- Advertisement -

या शपथविधी सोहळ्यासाठी आरजेडीचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी आपल्या कुटुंबासह पोहोचल्या. त्याच्यासोबत तेज प्रताप यादव, तेजस्वी यादव यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. मात्र अन्य कोणत्याही पक्षाच्या किंवा राज्यातील बड्या नेत्यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलेले नाही. त्याचवेळी लालू यादव यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू असल्याने तेही पाटण्याला पोहोचू शकलेले नाहीत.

- Advertisement -

या शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची पहिली कॅबिनेट बैठक पार पडणार आहे. सायंकाळी 5 वाजल्यापासून पाटण्यातील मुख्य सचिवालयात ही कॅबिनेटची बैठक होणार आहे. ज्यात विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

नितीश मंत्रिमंडळात 35 मंत्री असतील. RJD कोट्यातील 15 आमदार आणि JDU कोट्यातील 13 आमदारांना मंत्री केले जाणार आहे. चार मंत्रिपदे काँग्रेसला आणि एक मित्रपद एचएएमला देण्यात येणार आहे. गृहखाते जेडीयूकडेच राहील. भाजपच्या कोट्यातील खाते आरजेडीला मिळेल, अशी चर्चा बिहार राजकारणात रंगत आहे.

नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा प्रवास

नितीश कुमार 2000 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी जेडीयू आणि भाजप युतीला 151 जागा मिळाल्या. मात्र 324 जागांच्या बहुमतासाठी 163 जागांची गरज होती. आपल्याला बहुमत सिद्ध करता येणार नाही हे नितीशकुमारांना समजले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. तेव्हा फक्त 7 दिवस ते मुख्यमंत्री पदावर राहिले.

यानंतर 2005 मध्ये नितीशकुमार पुन्हा सत्तेत आले. भाजपसोबत युती करून बहुमत मिळवण्यात ते यशस्वी झाले. 2010 पर्यंत त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. 2010 मध्ये जनतेने पुन्हा एकदा नितीशकुमारांवर विश्वास टाकला आणि त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली.

2014 मध्ये लोकसभेतील पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी घेत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत NDA मधून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि जीतन राम मांझी यांना बिहारचे मुख्यमंत्री बनवले.

फेब्रुवारी 2015 मध्ये नितीश कुमार यांच्यावर नाराज जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, आणि पुन्हा नितीशकुमारचं मुख्यमंत्री झाले. 2015 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा नितीशकुमार यांनी महाआघाडीसोबत निवडणूक लढवली होती. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीला बहुमत मिळाले. आणि यावेळीही नितीशकुमार मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.

2017 मध्ये नितीश कुमार यांनी नैतिकतेचे कारण देत महाआघाडी सरकारचा राजीनामा दिला. यानंतर नितीशकुमार यांनी भाजपसोबत येऊन सरकार स्थापन केले आणि नितीश सहाव्यांदा मुख्यमंत्री झाले. 2020 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यावेळी जेडीयू आणि भाजपने एकत्र निवडणुका लढवल्या. आणि एनडीएचे सरकार स्थापन झाले. मात्र जेडीयूला केवळ 45 जागा मिळाल्या. असे असतानाही बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले. आता नितीशकुमार यांनी भाजप सोबतची युती तोडली आणि आघाडीसोबत सरकार स्थापन केले.


नितीश कुमार 8 व्यांदा होणार मुख्यमंत्री, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री: आज दुपारी शपथविधी सोहळा


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -