घरदेश-विदेशनितीश यांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला; भाजपचे असणार दोन उपमुख्यमंत्री

नितीश यांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला; भाजपचे असणार दोन उपमुख्यमंत्री

Subscribe

नितीश यांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला असून आज (रविवारी) राजभवनात सायंकाळी ४.३० वाजता राज्यपाल फागू चौहान नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. नितीशकुमार आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित असणार आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, आता बिहारमध्ये भाजपचे दोन उपमुख्यमंत्री तसेच विधानसभेचे अध्यक्ष असतील. हा निर्णय शनिवारी रात्री उशिरा भाजप आणि जनता दल युनायटेड यांच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शिवाय, भाजप-जेडीयू चे प्रत्येकी ७-७ मंत्री आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीचे प्रत्येकी १-१ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज एकूण १६ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

बिहारला दोन उपमुख्यमंत्री

तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची चर्चा आहे. अशाप्रकारे, बिहारमध्ये यावेळी २ उपमुख्यमंत्री असतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -