घरदेश-विदेशBihar Politics : फ्लोअर टेस्टआधीच जेडीयूचे 17 आमदार बेपत्ता; तेजस्वी यादव यांच्या...

Bihar Politics : फ्लोअर टेस्टआधीच जेडीयूचे 17 आमदार बेपत्ता; तेजस्वी यादव यांच्या पत्नीची पोस्ट चर्चेत

Subscribe

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत पुन्हा एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. नितीश कुमार यांनी काल (28 जानेवारी) बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि एनडीए सोबतच सत्तास्थापन केली. नवव्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून बिहारमध्ये राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. अशातच आता माहिती समोर येत आहे की, फ्लोअर टेस्टआधीच जेडीयूचे 17 आमदार बेपत्ता झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांच्या पत्नीची पोस्ट चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. (Bihar Politics 17 MLAs of JDU missing before floor test Tejashwi Yadav wife Rajshree Yadav post in discussion)

हेही वाचा – NCP : कोणत्या गटाकडे किती संख्याबळ! दोन्ही बाजूने सह्या केलेले पाच आमदार कोण?

- Advertisement -

बिहारमधील बदलत्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव यांनी ट्वीट केले आहे. हे त्यांचे अधिकृत खाते नसले तरी बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकारणासाठी केलेली पोस्ट चर्चेची ठरत आहे. या पोस्टमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, नितीश कुमार यांचे 17 आमदार बेपत्ता झाले आहेत. प्रत्यक्षात फक्त 4 ते 5 आमदार घेऊनच काम होऊ शकले असते, पण इथे जेडीयूचा अर्धा पक्ष गायब झाला आहे. खेळ होईल हे सर्वांना माहीत होते, पण एवढा मोठा खेळ होईल हे कोणालाच माहीत नव्हते.

फ्लोअर टेस्टची प्रतीक्षा 

फ्लोअर टेस्ट संदर्भात राजकीय विश्लेषकांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, जेडीयूचे काही आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लालू प्रसाद यादव काही तरी मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे, मात्र त्यात ते यशस्वी होतील की नाही हे 12 फेब्रुवारीला होणाऱ्या फ्लोअर टेस्टच्या दिवशीच कळेल. कारण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आमच्याकडे बहुमताचे आकडे आहेत आणि कुठेही अडचण येणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Modi Vs Rahul Gandhi : युवराज ना लिफ्ट होत आहेत ना लाँच; मोदींचा राहुल गांधींवर निशाणा

तेजस्वी यादव मुख्यमंत्री व्हावेत

दरम्यान, फ्लोअर टेस्ट आधी शहरात काही पोस्टर होर्डिंग्ज लावले आहेत. या पोस्टर्सवर तेजस्वी यादव यांचा मोठा फोटो लावताना म्हटले आहे की, तेजस्वी यादव मुख्यमंत्री व्हावेत अशी बिहारच्या जनतेची इच्छा असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ‘जन-जन की पुकार, तेजस्वी मांगता बिहार’ असे लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -