घरदेश-विदेशBihar Politics : मुख्यमंत्री नितीश कुमारांना 'शह' देण्यासाठी इंडिया आघाडीची रणनीती; असा...

Bihar Politics : मुख्यमंत्री नितीश कुमारांना ‘शह’ देण्यासाठी इंडिया आघाडीची रणनीती; असा आहे प्लॅन

Subscribe

बिहार : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar Chief Minister of Bihar) यांनी पुन्हा एकदा भाजपाशी (BJP) हातमिळवणी केली आहे. बिहारमध्ये जे राजकीय बदल झाला, त्यामुळे आता इंडिया आघाडी (India Alliance) आता प्रामुख्याने मुस्लिम आणि यादव मतांवर त्याचप्रमाणे NDA तील नाराज असलेल्या लहान पक्षांवर लक्ष केंद्रित करणार आहेत.

नितीश कुमार (Nitish Kumar) इंडिया आघाडीमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वातील JDU 17 आणि RJD 16 जागा देण्याची ठरले होते. इंडिया आघाडीतून निघून गेल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना RJD ला अधिक जागांवर आपले नशीब अजमावता येणार आहे. काँग्रेसला (Congress) मुस्लिमबहुल मतदारांचा कौल घेता येईल. लोकसभा निवडणुकीत (lok Sabha Election) RJD ला गेल्या वर्षी एकाही जागांवर विजय मिळविता आला नाही. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत RJD सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यामुळे यावेळी RJD 22 ते 25 जागांवर निवडगूक लढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काँग्रेस 10 ते 12 जागांवर निवडणूक लढेल, त्यात मुस्लिमबहुल संघाचा राहणार. बिहारमध्ये आणि मुस्लिम मतांची एकूण संख्या 31 टक्के आणि याचा फायदा RJD आणि काँग्रेस उचलण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. नितीश कुमार भाजपसोबत आल्याने NDA मधील छोटे पक्ष नाराज झाले. या पक्षांना दाबून टाकण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीतर्फे केला जात आहे. यामध्ये राष्ट्रीय लोक दलाचे उपेंद्र कुशवाह, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतनराम मांझी आणि विकासशील इंसान पार्टीचे मुकेश सहानी यांना इंडिया आघाडीसोबत घेण्याचा प्रयत्न राजद, काँग्रेसचे नेते करत आहेत. बिहारमध्ये आता छोट्या पक्षांना सामावून घेण्याची तयारी सुरु झाली आहे. नितीश कुमार आल्याने LJP ( Lok Janshakti Party) चे खासदार चिराग पासवान खुश नाहीत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -