२०२४ ला २०१४ वाले नक्कीच राहणार नाहीत, नितीश कुमारांचा मोदींना टोला

या शपथविधीनंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. २०२४ मध्ये असू किंवा नसू, पण २०१४ वाले नक्कीच राहणार नाहीत, असं नितीश कुमार म्हणाले.

bjp leaders behaviour becomes headache for bihar cm nitish kumar

पाटणा – नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बिहारच्या राजभवानात दुपारी 2 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीनंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. २०२४ मध्ये आम्ही असू किंवा नसू, पण २०१४ वाले नक्कीच राहणार नाहीत, असं नितीश कुमार म्हणाले. (Bihar cm Nitish Kumar Targeted BJP And PM Modi After Taking Oath)

हेही वाचा – नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली बिहार मुख्यमंत्री पदाची शपथ

काही दिवसांपूर्वी बिहारमध्येच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी स्थानिक पक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. देशभरातील स्थानिक पक्ष संपतील आणि भाजपा एकटाच उरेल असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला पंधरा दिवस उलटत नाही तोवरच बिहारमध्ये भाजपला मोठा धक्का मिळाला आणि सत्तांतर घडून आलं आहे. यावर नितीश कुमार म्हणाले की, आम्ही स्थानिक पक्षांनी मिळूनच सत्ता स्थापन केली आहे. शपथही घेतली आहे. इतर मंत्र्यांचाही लवकरच शपथविधी होणार आहे.

मी २०२० मध्ये मुख्यमंत्री होण्याच्या स्थितीत नव्हतो. पण माझ्यावर दबाव टाकण्यात आला. पण त्यानंतर जे काही झालं ते सर्वांनीच पाहिलं. आमच्या पक्षातील लोकांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपसोबत युती तोडली. गेल्या दीड महिन्यांपासून आमच्याशी कोणी बोलत नव्हतं. आमच्यासोबत खूप वाईट घडत होतं. २०२० मध्ये आम्ही भाजपसोबत गेल्यानं आमचं नुकसान झालं, असंही नितीश कुमार म्हणाले.

हेही वाचा – नितीश कुमारांच्या राजकीय भूकंपात प्रशांत किशोर यांचा हात?, रणनीतिकारांचं स्पष्टीकरण…

यावेळी राबडी देवी म्हणाल्या की, बिहारची जनता आता खूप खुश आहे. आम्ही सर्वांना धन्यवाद आणि शुभार्शिवाद देत आहोत. या निर्णयामुळे सर्वच खूश आहेत. तसंच, आम्ही तरुणांसाठी काम करणार आहोत, असं आश्वासन तेजस्वी प्रताप यादव यांनी सांगितलं.