घरताज्या घडामोडीWeather Today: उत्तर भारतात 'लू'चा कहर; 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता

Weather Today: उत्तर भारतात ‘लू’चा कहर; ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता

Subscribe

सध्या उत्तर भारतात आणि इतर राज्यांमध्ये उष्णतेचा आणि लूचा कहर सुरू आहे. वाढता पारा आणि उष्णतेमुळे लोकं हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या मते, दिल्ली, हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, पश्चिम मध्यप्रदेश आणि गुजरातच्या बहुतेक शहरांमध्ये भीषण लू चालणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. राजधानी दिल्लीत उष्णतेची लाट पाहता हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केले आहे. दिल्लीतील कमाल तापमान आज 42 डिग्री सेल्सियस असेल तर किमान 28 डिग्री सेल्सियस असेल.

बिहार आणि उत्तर प्रदेशमधील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

बिहारच्या पश्चिम आणि पूर्व चंपारण, गोपालगंज, अररिया आणि किशनगंज जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका आणि मध्यम पाऊस पडू शकता. तर उत्तर प्रदेशमध्ये कानपूरसह देहात, उन्नाव, हमीरपूर, हरदोई, फतेहपूर, फर्रूखाबाद, बांदा, जालौन, महोबा, कन्नौज, चित्रकूट, इटावा इत्यादी जिल्ह्यांमध्ये 13 ते 17 एप्रिल दरम्यान धुळीच्या वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हा पहिला पाऊस असेल.

- Advertisement -

हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता

हिमाचल प्रदेशात उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मंगळवारी, १२ एप्रिलपासून प्रदेशातील बहुतेक क्षेत्रात पावसाचा अंदाज आहे. १५ एप्रिलपर्यंत प्रदेशच्या काही क्षेत्रात हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सक्रियतेमुळे हवामानात हा बदल होत आहे. यामुळे अनेक भागात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. शिमलाच्या हवामान खात्यानुसार, उत्तर प्रदेशाच्या मध्य आणि उंच डोंगराळ भागात १२ ते १५ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता आहे. तर सखल आणि मैदानी भागात १२ ते १४ एप्रिलदरम्यान पाऊस होण्याची अधिक शक्यता आहे. यादरम्यान या भागांमध्ये वादळामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

या राज्यांमध्येही पावसाची शक्यता

आज तामिळनाडू, लक्षद्वीप, केरळ, मेघालयमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय आसाम, अरुणाचल प्रदेशातही हलक्या पावसाचा अंदाज आहे.

- Advertisement -

जाणून घ्या पाच प्रमुख शहरांमधील तापमान

शहर            कमाल तापमान            किमान तापमान
दिल्ली            42 डिग्री                    28 डिग्री
जयपूर            41 डिग्री                    29 डिग्री
पटना             37 डिग्री                    25 डिग्री
भोपाल            43 डिग्री                    23 डिग्री
लखनऊ          41 डिग्री                    24 डिग्री


हेही वाचा – Trikut ropeway Accident : अजूनही रोपवेत अडकलेत आठ जण; 24 तासांपासून बचावकार्य सुरू


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -