बेगुसराय: बिहारमध्ये 1970 आणि 1980 च्या दशकात पकडौआ विवाहाची प्रथा जोरात सुरू होती. अशाच एका घटनेची आठवण करून देणाऱ्या लग्नाचे प्रकरण समोर आले आहे. चहा प्यायला बोलवलं आणि लग्न लावून दिलं, असा आरोप नवरदेवाने केला आहे. यात मुलाकडची बाजू बळजबरीने लग्न लावल्याचे सांगत आहे, तर मुलीच्या बाजूने याला नकार देत प्रेमविवाह असल्याचे म्हटले आहे. मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मुलगा आणि मुलगी यांचे मागील 6 महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. नुकतेच रिंटू कुमार या मुलाने मुलीचे अपहरण केले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मुलाला पोलिसांनी बोलावले तेव्हा कुटुंबीयांनी आनंदाने दोघांचे लग्न लावून दिले. (Bihar Unique Marriage in Begusaray Pakdaua Marriage done with Government Employee in Bihar)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण बेगुसराय, समस्तीपूर आणि सीतामढी या तीन जिल्ह्यांतील आहे. वास्तविक, मुलगा म्हणजेच वराचे नाव रिंटू कुमार आहे, जो बेगुसराय जिल्ह्यातील छौराही पोलीस स्टेशन क्षेत्रातील तलाला गावचा रहिवासी आहे. हा सध्या सीतामढीच्या रुन्नी सैदपूर पंचायतीमध्ये महसूल कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. चंद्रकला राणी ही मुलगी समस्तीपूर जिल्ह्यातील विभूतीपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणारी आहे. नुकतेच चंद्रकला राणीचे आई-वडील लग्नाचा प्रस्ताव घेऊन रिंटू कुमारच्या घरी गेले होते पण रिंटू कुमारने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता.
पुन्हा चहाला बोलावलं..
रिंटू कुमार काही दिवसांसाठी घरी आला होता, तेव्हा चंद्रकला राणीलाही तिच्या कुटुंबीयांनी छौराही पोलीस स्टेशन हद्दीतील तलाला गावात एका नातेवाईकाच्या घरी पाठवले होते, तिथे दोघेही भेटले आणि रिंटू कुमारला चहासाठी बोलावण्यात आले. त्यानंतर चंद्रकला राणीच्या कुटुंबीयांनी चंद्रकला राणीचे परीक्षा केंद्र सीतामढीमध्ये आहे, त्यामुळे कृपया तिला मदत करा, असे सांगितले होते. रिंटू कुमार यांनी त्याला होकार दिला.
अपहरण प्रकरण
चंद्रकला राणीला तिच्या कुटुंबीयांनी सीतामढीला नेले आणि रिंटू कुमारसोबत सोडले आणि विभूतीपूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हाही दाखल केला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि पोलिसांनी रिंटू कुमारशी त्याच्या मोबाईलवरून संपर्क साधला तेव्हा रिंटू कुमार चंद्रकला राणीसह विभूतीपूर पोलीस ठाण्यात पोहोचला जेथे कुटुंबातील सदस्य आधीच उपस्थित होते. तिथल्या एका मंदिरात दोघांनी लग्न केलं.
रिंटू कुमार म्हणाले की, एकीकडे मुलीची बाजू म्हणते की, मुलगा आणि मुलगी 6 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते, तर दुसरीकडे महसूल कर्मचारी रिंटू कुमार यांनी हा कट असल्याचे म्हटले आहे आणि हा जबरदस्तीचा विवाह असल्याचं सांगितलं आहे.
(हेही वाचा: Jitendra Awhad : राजकरणात एवढे प्रेम, आपुलकी एकमेकांबद्दल होती…; आव्हाडांनी शेअर केले बाळासाहेबांचे पत्र)