Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश परीक्षा सुरु असतानच विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म

परीक्षा सुरु असतानच विद्यार्थीनीने दिला बाळाला जन्म

बिहारच्या मुजफ्फरपूरमधील घटना

Related Story

- Advertisement -

दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरु असतानाच परीक्षागृहातच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. बिहामधील मुजफ्फरपूरमध्ये ही घटना घडली आहे. एक प्रेग्नंट विवाहित विद्यार्थीनी दहावीच्या परीक्षेसाठी एमडीडीएम कॉलेजमध्ये दाखल झाली होती. शनिवारी अचानक पेपर सोडवत असताना एका तासानंतर तिच्या पोटात प्रसुतीच्या वेदना सुरु झाल्या. यावेळी तिला दुसऱ्या खोलीत नेण्यात आले. ऐन परिक्षेच्या मोक्यावर बाळाचा जन्म झालेल्या या बाळाचे नाव ‘इम्तिहान’ ठेवण्यात आले आहे.

अचानक महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्याने उपस्थित शिक्षकांनी याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिली. यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहचताच तिने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याचदरम्यान तिच्या पतीनेही रुग्णालयात धाव घेतली. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती या विवाहित विद्यार्थीनीच्या पतीने दिली आहे. तिच्या नवऱ्याच्या माहितीनुसार, पत्नीने परीक्षेच्या काळातच मुलगाला जन्म दिला. त्यामुळे आता त्याचे नाव ‘इम्तिहान’ ठेवणार आहोत.


हेही वाचा- महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार? मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद

- Advertisement -

 

- Advertisement -