घरदेश-विदेशBike Taxi : बाइक टॅक्सी बंदीवर सुप्रीम कोर्टाने मागितले केंद्राकडे उत्तर; Ola,...

Bike Taxi : बाइक टॅक्सी बंदीवर सुप्रीम कोर्टाने मागितले केंद्राकडे उत्तर; Ola, Uber,Rapido ची याचिका

Subscribe

 

नवी दिल्लीः Ola, Uber,Rapido च्या Bike Taxi वर बंदी का घातली , याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले.

- Advertisement -

दिल्ली सरकारने Bike Taxi वर बंदी आणली. त्याला Ola, Uber,Rapido या कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन दिल्ली सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले. दिल्ली उच्च न्यायालयाने कंपन्यांच्या बाजूने निकाल देत दिल्ली सरकारने घातलेली बंदी उठवली. त्याविरोधात दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. अनिरुद्ध बोस व न्या. राजेश बिंदल यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेची प्रत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना देण्यात यावी, जेणेकरुन केंद्र सरकारचे या बंदी बाबतचे मत जाणून घेता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही वाचाःधमक्या दिल्या तरी आवाज बंद होणार नाही, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

जानेवारी २०२३ मध्ये दिल्ली सरकारने एक नोटीस काढली. या नोटीसद्वारे दिल्लीत Bike Taxi ला मनाई करण्यात आली होती. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला एक लाख रुपये दंड ठोठावला जाईल, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला होता. कोणताही अंतिम आदेश जारी होण्याआधीच दिल्ली सरकारच्या नोटीसला स्थगिती देणे म्हणजे Bike Taxi ला परवानगी देण्यासारखं आहे. त्यामुळे दिल्ली न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केजरीवाल सरकारने न्यायालयात केली आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकारला याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी सोमवारी, १२ जूनला होणार आहे.

पुण्यात Bike Taxi ला बंदी

पुण्यात बाईक टॅक्सी सेवा विरोधात रिक्षा चालकांनी केलेल आंदोलन यशस्वी झाले होते. रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केले होते. रिक्षा चलकांच्या या आंदोलनानंतर ओला आणि उबेर कंपनीने त्यांची बाइक टॅक्सी ऑनलाइन सेवा बंद केली होती. पुण्यात बाईक टॅक्सीला विरोध करत रिक्षा संघटनांनी एकत्र येत बंद पुकारला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समिती नेमून या संदर्भात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यावेळी आंदोनल मागे घेण्यात आले होते. मात्र, याला दोन आठवडे उलटूनही सरकारने या संदर्भात कोणताही निर्णय न घेतल्याने, पुण्यातील रिक्षा संघटना पुन्हा आक्रमक झाल्या होत्या. पुण्यात रिक्षा संघटनांनी आंदोलन केले होते. विशेष म्हणजे संगम ब्रिज येथील आरटीओ कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक जमले आणि त्यांनी आपल्या रिक्षा तिथेच सोडत पुन्हा घरी गेले होते. त्यानंतर बोला आणि उबेर कंपनीने Bike Taxi बंदी केली होती. आरटीओ कार्यालयाबाहेर केलेल्या ठिय्या आंदोलनाविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. रिक्षा संघटनेचे केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या वर्षी हे आंदोलन झाले होते.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -