घरदेश-विदेशगोध्रा कांड : बिल्किस बानोच्या गुन्हेगारांच्या खटल्यावर आज सुर्वोच्च न्यायालयात सुनावणी

गोध्रा कांड : बिल्किस बानोच्या गुन्हेगारांच्या खटल्यावर आज सुर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Subscribe

 

नवी दिल्लीः गोध्रा हत्याकांडातील ११ आरोपींची सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाविरोधात बिल्कीस बानो यांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालय या याचिकेवर काय आदेश देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisement -

गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये दंगल उसळली. दंगलीत जमावाने बिल्कीस बानो यांच्या घरावर हल्ला केला. बानो यांच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आली. हल्ल्यात बानो यांच्या तीन वर्षांच्या मुलीचीही हत्या करण्यात आली. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कार झाला तेव्हा बिल्कीस बानो गरोदर होत्या. याप्रकरणी दोषी धरत न्यायालयाने ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

१५ ऑगस्ट, २६ जानेवारीला विशेष अधिकारांचा वापर करत राज्य सरकार शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश जारी करते. अशाच प्रकारे गुजरात सरकारने बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ आरोपींची सुटका करण्याचे आदेश जारी केले. हे आदेश जारी करताना १९९२ च्या मुदतपूर्व सुटका कायद्याचा आधार घेण्यात आला.

- Advertisement -

या सुटकेला बिल्कीस बानो यांनी याचिकेद्वारे आवाहन दिले आहे. ही सुटका बेकायदा असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. गुजरात सरकारने विशेष अधिकार वापरुन ११ आरोपींची सुटका केली आहे. गुजरात सरकारने चुकीच्या पद्धतीने विशेष अधिकारांचा वापर केला आहे. त्यामुळे आदेश रद्द करावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी बिल्कीस बानो यांनी सरन्यायाधीस धनंजय चंद्रचुड यांच्या खंडपीठासमोर केली होती. यास सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने होकार दिला होता. त्यानुसार आज बिल्कीस बानो यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आपले विशेष अधिकार वापरताना कोणतीही चूक केलेली नाही हे गुजरात सरकार न्यायालयाला कशा पद्धतीने पटवून देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तसेच गुजरात सरकारने कशी चूक केली हे बिल्कीस बानो कशा प्रकारे न्यायालयाला सांगणार हेही बघावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -