घरदेश-विदेशबिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा यांचा घटस्फोट, २७ वर्षांच्या वैवाहिक नात्यातून विभक्त

बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा यांचा घटस्फोट, २७ वर्षांच्या वैवाहिक नात्यातून विभक्त

Subscribe

प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सोमवारी घेतलेल्या या निर्णयाने संपूर्ण जगालाच मोठा धक्का बसला. २७ वर्षांच्या वैवाहिक नात्यातून विभक्त होत त्या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केली. तसेत त्यांनी मागील २७ आम्ही वर्षे सोबत प्रवास केला. आता वेगळे होत असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

पत्रकात केलं घटस्फोटाचं कारण स्पष्ट

“आम्ही खूप विचार केल्यानंतर आणि आमच्या नात्यावर काम करुन अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षांच्या प्रवासात आम्ही ३ मुलांना वाढवलं आणि जगभरातील लोकांना एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी संस्था उभी केली. आमचा त्या विचारांवर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही घटस्फोटानंतरही ते काम करणं सुरुच ठेऊ.” बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी संयुक्त पत्रकात म्हटले आहे. यासह भविष्यातही सोबत काम करणार असलो तरी उर्वरीत आयुष्यात आम्ही कपल म्हणून एकत्रित राहू शकत नाही. आम्ही एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आम्हाला यासाठी अवकाश आणि खासगीपण द्यावं हीच विनंती, असेही म्हटले आहे.

- Advertisement -

१९९४ मध्ये हवाई येथे बिल आणि मेलिंडा विवाहबंधनात अडकले होते. मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून मेलिंडा कार्यरत असतानाच त्यांची ओळख झाली होती. बिल गेट्स यांनी लहानपणीचा मित्र पॉल एलनसोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. २०१८ मध्ये पॉल एलन यांचा मृत्यू झाला. १९८० मध्ये मायक्रोसॉफ्टने आयबीएमसोबत एकत्र येऊन ऑपरेटिंग सिस्टम तयार केली. नंतर ही सिस्टम MS-DOS नावाने ओळखली गेली. मायक्रोसॉफ्ट १९८६ मध्ये लोकांपर्यंत पोहचली. त्यानंतर एका वर्षातच वयाच्या ३१ व्या वर्षी बिल गेट्स जगातील अब्जपती बनले. गेट्स २००० पर्यंत कंपनीचे सीईओ होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने “बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन” या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -