भारताचा कोरोना लसीकरणाचा २०० कोटींचा टप्पा पार; पंतप्रधान मोदींचे बिल गेट्सकडून कौतुक

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यभरात लसीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली देशात कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली होती

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यभरात लसीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली देशात कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणाची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात आली होती. या मोहिमेतंर्गत भारताने २०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे जगभरातून कौतुक केले जात असून, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. (bill gates congratulates pm modi for india achieving 200 crore covid 19 vaccinations)

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. “कोरोना प्रतिबंधासाठी 200 कोटी लसीकरणाचा आणखी एक टप्पा गाठल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. कोविड19 चा प्रभाव कमी करण्यासाठी भारतीय लस उत्पादक आणि भारत सरकार यांच्यासोबतच्या आमच्या सततच्या भागीदारीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत”, अशा शब्दांत बिल गेट्स यांनी मोदींचे कौतुक केले आहे.

२०० कोटी लसीकरणाचे यश संपादन केल्याबद्दल भारताचे जगभरातून कौतुक होत आहे. दरम्यान, देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेतंर्गत भारताने दीड वर्षानंतर म्हणजेच १७ जुलै रोजी २०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली असून, भारताने पुन्हा इतिहास रचला आहे, असेही त्यांनी म्हटले.

मंगळवारी पुन्हा दोन हजाराच्या घरात नव्या रुग्णांची संख्या गेल्याने राज्यावरील दिलासा कमी झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आज दिवसभरात २ हजार २७९ नवे बाधित सापडले असून २ हजार ६४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत.


हेही वाचा – उद्या बाळासाहेबांना आम्हीच शिवसेनेत आणल्याचा दावाही करतील; संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला