घरताज्या घडामोडीट्रम्प यांना २०१६ मध्येच साथीच्या रोगाचा इशारा दिला होता - बिल गेट्स

ट्रम्प यांना २०१६ मध्येच साथीच्या रोगाचा इशारा दिला होता – बिल गेट्स

Subscribe

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०१६ सालीच साथीच्या रोगाबद्दल माहिती दिली होती, असा खुलासा केला आहे.

संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचं संकट आहे. अशा परिस्थितीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बिल गेट्स यांनी मोठा खुलासा केला आहे. बिल गेट्स यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे की, त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०१६ मध्येच साथीच्या रोगाचा इशारा दिला होता.

सोमवारी वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “मी युरोप, अमेरिका, जगभरातील लोकांना भेटलो.” २०१६ मध्ये त्यांनी ट्रम्प टॉवर येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमवेत बैठकदेखील केली होती, ज्यात त्यांनी त्यांच्याशी भविष्यातील साथीच्या विषयी चर्चा केली. त्यांनी हे मुद्दे अधिक जोरदारपणे उपस्थित करायला हवे होते, असं त्यांनी सांगितलं. पुढे म्हणाले, हे भयंकर दिसत आहे. मी याबद्दल सांगू शकतो की आम्ही वेळेत कारवाई केली असती तर आपलं नुकसान कमी केलं असतं. बिल गेट्स म्हणाले, “लोकांचे या धोक्याकडे लक्ष वेधण्यासाठी मी त्यावेळी अधिक आवाज उठवला असता तर अशी परिस्थिती उद्भवली नसती.”

- Advertisement -

हेही वाचा – कोरोना विषाणूची लस कधीच बनणार नाही; ब्रिटनच्या पंतप्रधानांचा इशारा


बिल गेट्स यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं की बर्‍याच जागतिक नेत्यांनी त्यांच्या सल्ला तत्त्वत: मान्य केला, काहींनी तर त्यासंदर्भात तयारी करण्यासाठी पावले उचलली. काही देशांनी स्वतःहून संभाव्य तोडगा शोधण्याचा प्रयत्नही सुरू केला होता. पुढे ते म्हणाले, “जेव्हा जेव्हा मी श्वसनासंबंधी विषाणूबद्दल विचारलं, आपण किती संक्रमण कमी करू शकता? मास्क खरोखर मदत करतात की नाही?” अशा प्रश्नांसाठी त्यांना सरकारकडून कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -