घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटतर श्रीमंत देशातून कोरोना सर्वात आधी जाणार; जाणून घ्या कारण

तर श्रीमंत देशातून कोरोना सर्वात आधी जाणार; जाणून घ्या कारण

Subscribe

कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणारी लस शोधण्यासाठी जगातील अनेक देश अहोरात्र काम करतायत. अनेक देशांनी लसीवर दोन ते तीन ट्रायल सुद्धा केल्या आहेत. जर २०२१ पर्यंत कोरोनावरील प्रभावी लस मिळाल्यास जगातील श्रीमंत देश सर्वात आधी कोरोनामुक्त होऊन तेथील परिस्थिती सामान्य होऊ शकेल, असा अंदाज मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी वर्तविला आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बिल गेट्स यांनी वॉल स्ट्रिट जर्नलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले. गेट्स म्हणाले की, अमेरिकेत ज्या व्हॅक्सिनची ट्रायल घेतली जात आहे, त्यामध्ये फारक काही यश मिळेल, असे वाटत नाही.

बिल गेट्स पुढे म्हणाले की, “कोरोनाची लस सुरक्षित असल्याचे लोकांना सांगण्यासाठी जागृती निर्माण करावी लागेल. ज्यामुळे लोक लस घेण्यापासून वंचित राहणार नाहीत. कोरोना व्हायरसचा संसर्ग बिलकूल होत नाही, अशा परिस्थितीत पोहोचायला आपल्याला २ ते ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो. जर लस लवकर मिळाली तर पुढच्या वर्षीपर्यंत श्रीमंत देशात परिस्थिती सुधारू शकते.” जगातील श्रीमंत देशांनी कोरोनावरील लस विकत घेण्यासाठी आर्थिक तरतूद करुन ठेवलेली आहे. तसेच त्यांच्याकडे लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा देखील तयार आहे. भारत आणि चीन या मोठ्या लोकसंख्येचा विचार केल्यास श्रीमंत देशांची लोकसंख्या देखील तशी कमीच आहे.

- Advertisement -
bill gates
बिल गेट्स

बिल गेट्स यांनी दावा करण्याआधी WHO ने देखील या वर्षअखेरीस कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते असे सांगितले आहे. अमेरिकेत सध्या फाइजर, एस्ट्रेजेनका आणि मॉडर्ना यांच्यासहीत काही कंपन्या लसीवर प्रयोग करत आहेत. सुरुवातीच्या काही ट्रायल्समध्ये लसीचा निकाल चांगला लागला. मात्र तज्ज्ञांच्या मतानुसार या लसीपैकी किती लसी प्रभावी ठरतील याबाबत काहीच सांगता येत नाही.

रशिया आणि चीन यांनी कोरोना लसीच्या संशोधनात आणि वापरात जगाच्या एक पाऊल पुढे टाकलेले आहे. दोन्ही देशांमध्ये लसीचे फेज ३ ट्रायल बाकी असले तरी त्यांनी सामान्य लोकांचे लसीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. बिल गेट्स म्हणाले की, चीन आणि रशियाची लस प्रभावी आणि वैध आहे. मात्र फेज ३ ट्रायल बाकी असल्यामुळे इतर देश त्यामध्ये अजूनतरी रस दाखवत नाहीयेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -