घरदेश-विदेशलादेनच्या अंगरक्षकाचे ट्युनेशियाकडे हस्तांतरण

लादेनच्या अंगरक्षकाचे ट्युनेशियाकडे हस्तांतरण

Subscribe

ओसामा बिन लादेनच्या बॉडीगार्डचे जर्मनीने ट्युनेशियाकडे हस्तांतरण केले आहे. सामीचे हस्तांतरण करता यणार नाही असे न्यायालयाने आपल्या आदेशामध्ये म्हटले होते.

कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनच्या बॉडीगार्डचे जर्मनीने ट्युनेशियाकडे हस्तांतरण केले आहे. सामी असे या ४२ वर्षीय बॉडीगार्डचे नाव आहे. सामीचे ट्युनेशियाकडे हस्तांतर करावे की नाही? यासंदर्भात शेवटपर्यंत कोणताही निर्णय होत नव्हता. सामी हा ओसामा बिन लादेनकडे बॉडीगार्ड म्हणून काम करायचा. अमेरिकेने लादेनचा खात्मा केल्यानंतर सामी जर्मनीमध्ये आश्रयाला होता. मुळचा ट्युनेशियाचा असलेल्या सामीचे ट्युनेशियाकडे हस्तांतरण करण्याबाबत जर्मनीमध्ये शेवटच्या घटकेपर्यंत मत-मतांतरे होते. अखेर शुक्रवारी सामीचे ट्युनेशियाकडे हस्तांतरण करण्यात आले. एका खासगी विशेष विमानाने सामीला ट्युनेशियाच्या हवाली करण्यात आले. सामी जर्मनीमध्ये राहून वेलफेअर फंड गोळा करत असल्याने त्यावरून देखील मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर सामीच्या हालचाली घातक असल्याचे जर्मनीने जाहीर केले. पण, त्यानंतर त्याला ट्युनेशियाच्या हवाली करू शकत नाही, असे जर्मनीने स्पष्ट केले होते. सामीला ट्युनेशियाच्या हवाली केल्यानंतर त्याचे अमानुष हाल होतील तसेच त्याच्यावर अत्याचार केले जातील असे जर्मनीचे म्हणणे होते. त्यामुळे सामीचे हस्तांतरण होवू शकत नाही असे जर्मनीने स्पष्ट केले होते.

हस्तांतरणाला न्यायालयाची स्थगिती

सामीच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला जर्मनीतील न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. कोर्टाचे हे आदेश संबंधित पोलिसांकडे पोहोचण्यास देखील उशिर झाला. यामध्ये न्यायालयाने सामीचे हस्तांतरण करता येणार नाही असे आदेश दिले होते. त्यामुळे त्याला पुन्हा जर्मनीमध्ये आणा असे या आदेशामध्ये न्यायालयाने म्हटले होते. पण, सामीचे हस्तांतरण रोखणे शक्य झाले नाही. जर्मनीच्या सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार सामीचे ट्युनेशियाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. पण, न्यायालयाच्या निर्णयानुसार त्याला जर्मनीमध्ये परत आणले जाणार का? यावर मात्र प्रवक्त्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. शिवाय, सामीबद्दलचे सर्व निर्णय हे सरकारी पातळीवर झाल्याचे देखील प्रवक्त्याने स्पष्ट केले. दरम्यान, दोन्ही सरकारांमध्ये या विषयावर संवाद चालू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -