Bindeshwar Pathak : सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक (Founder Sulabh International) डॉ. बिंदेश्वर पाठक (Bindeshwar Pathak) यांचे आज (15 ऑगस्ट) निधन झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णायलयात त्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. (Bindeshwar Pathak Sulabh Internationals Bindeshwar Pathak passes away Condolences from the Prime Minister)
हेही वाचा – PM Modi Speech : मोदींचे लाल किल्ल्यावरून भाषण; मात्र ‘कुटुंब’ शब्दावरून काँग्रेसने घेतला आक्षेप
सुलभ इंटरनॅशनलच्या कार्यालयात आज आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर डॉ. बिंदेश्वर पाठक यांची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत बिंदेश्वर पाठक हे महान भारतीय समाजसुधारकांमध्ये ओळखले जातात. 1970 मध्ये त्यांनी सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनची स्थापना केली होती.
The passing away of Dr. Bindeshwar Pathak Ji is a profound loss for our nation. He was a visionary who worked extensively for societal progress and empowering the downtrodden.
Bindeshwar Ji made it his mission to build a cleaner India. He provided monumental support to the… pic.twitter.com/z93aqoqXrc
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2023
पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त
डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे निधनाने आपल्या देशाचे मोठे नुकसान होणार आहे. ते एक द्रष्टे होते. ज्यांनी सामाजिक प्रगती आणि दीनदुबळ्यांना सशक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. बिंदेश्वर पाठक यांनी स्वच्छ भारत घडवणे हे आपले ध्येय बनवले. त्यांनी स्वच्छ भारत मिशनला मोलाचे सहकार्य केले. आमच्या विविध संभाषणांमध्ये त्यांची स्वच्छता बद्दलची तळमळ नेहमीच दिसून येत होती. त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देत राहील, असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले.
हेही वाचा – Mohan Bhagwat : देशाने पुढे जाताना जगाचे नेतृत्व करावे; संघप्रमुखांचे मोठे वक्तव्य
कोण होते बिंदेश्वर पाठक?
सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी पाच दशकांहून अधिक काळ चाललेली राष्ट्रव्यापी स्वच्छता चळवळ उभारण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या पुढाकारामुळे ठिकठिकाणी सुलभ शौचालयाचे बांधकाम शक्य झाले. ज्यांना शौचायले परवजत नव्हते त्यांना बिंदेश्वर पाठक यांनी मदत केल्यामुळे लाखो गंभीर वंचित गरीबांच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडले.
डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी महात्मा गांधींना आपले प्रेरणास्थान मानले होते. गेल्या 50 वर्षांत त्यांनी हाताने शौचालयाची सफाई करणाऱ्या कामगारांच्या मानवी हक्कांसाठी अथक परिश्रम घेतले. या कामगारांचे पुनर्वसन करणे, त्यांना कौशल्य विकासाद्वारे पर्यायी रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांच्या प्रतिष्ठेची काळजी घेणे हे त्यांच्या कार्याचे उद्दिष्ट होते. डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी शांतता, सहिष्णुता आणि सशक्तीकरण यांना प्रोत्साहन देण्याचे प्रेरणादायी उदाहरण समाजाला घालून दिले आहे.