12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणासाठी Corbevax Vaccine ला DCGI ची मंजुरी

biological e s vaccine corbevax receives emergency use nod for children between 12 18 yrs

कोरोना संसर्गाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आता आणखी एका लसीला मान्यता देण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने आपत्कालीन वापरासाठी बायोलॉजिकल E कंपनीच्या Corbevax लसीला मान्यता दिली आहे. यामुळे 12 ते 18 वयोगटातील मुलांना ही लस दिली जाईल. याआधी भारतात केवळ 15 वर्षांवरील मुलांना लस दिली जात होती. मात्र आता 12 वर्षांवरील मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतात विकसित झालेली ही तिसरी स्वदेशी लस आहे. दोन डोस असलेल्या या लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये केले जाणार आहे.

देशात कोरोना विषाणूविरोधा सध्या कोवॅक्सिन, कोविशील्ड, स्पुतनिक व्ही या लसींचा सर्वाधिक वापर केला जातोय. यानंतर फायझर, मोडर्ना लसींना मान्यता देण्यात आली आहे. यापाठोपाठ आता कार्बेवॅक्स लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल, कमी किंमतीत ही बाजारात उपलब्ध होईल, ही लस तयार करण्यासाठी केवळ 50 रुपयांचा खर्च येतो. पण बाजारात ही लस 250 रुपयांना उपलब्ध होईल.

कॉर्बेवॅक्स लसीला मंजुरी देण्यापूर्वी लसीकरण निरीक्षणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी सांगितले की, कॉर्बेवॅक्स पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ही लस इतर व्हेक्टर लसींच्या तुलनेत उत्तम अँटीबॉडी तयार करते.


Saif Ali Khan ची कार्बन कॉपी मुलगा jeh; बहीण saba Ali Khan ने शेअर केला फोटो