घरदेश-विदेशओमायक्रॉनबाधित रुग्णांत अधिक रोगप्रतिकारशक्ती, बायोएनटेक एसई आणि वॉशिंग्टन विद्यापीठाचा संशोधन अहवाल

ओमायक्रॉनबाधित रुग्णांत अधिक रोगप्रतिकारशक्ती, बायोएनटेक एसई आणि वॉशिंग्टन विद्यापीठाचा संशोधन अहवाल

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगातील 50 देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. वेगवेगळ्या व्हेरियंटच्या रूपात कोरोना बहुतेक देशांमध्ये संसर्ग पसरवत आहे.

जगभरात वेगवेगळ्या व्हेरियंटच्या रूपात कोरोनाचे संकट अजूनही घोंगावत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटने तर भारतासहीत अनेक देशांना तडाखा दिल्याचे सर्वांच्या स्मरणात असेल. परंतु ओमायक्रॉन व्हेरियंटने बाधित रुग्णांच्या संशोधनातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर ज्या रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा होते, त्या रुग्णांमध्ये इतर रुग्णांच्या तुलनेत अधिक प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. या रोग प्रतिकारशक्तीच्या माध्यमातून असे रुग्ण कोरोना विषाणूच्या इतर प्रकारांपासून देखील स्वतःचे संरक्षण करू शकतात, अशी माहिती कोरोना प्रतिबंधक लस निर्माण करणारी कंपनी बायोएनटेक एसई आणि वॉशिंग्टन विद्यापीठाने केलेल्या संशोधनातून पुढे आली आहे. एवढेच नाही, तर ओमायक्रॉनचा संसर्ग लसीकरण झालेल्या रुग्णांमध्ये बूस्टर डोसपेक्षा चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करत असल्याचे हा संशोधन अहवाल सांगतो.

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असून तेथे मागील काही दिवसांमध्ये 15 हून अधिक शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले होते. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सचे विश्लेषक सॅम फाझेली यांच्या मते, कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या लाटा यापुढेही अधिक वेगाने येत राहतील, ओमायक्रॉनच्या संसर्गात वाढ होत राहील. त्यामुळे आपल्याला दक्ष राहण्याची नितांत आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर बायोएनटेक एसई आणि वॉशिंग्टन विद्यापीठाचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरतो.

- Advertisement -

50 देशांमध्ये कोरोना सक्रिय
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, जगातील 50 देशांमध्ये कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. वेगवेगळ्या व्हेरियंटच्या रूपात कोरोना बहुतेक देशांमध्ये संसर्ग पसरवत आहे. लसीकरण हाच त्यावरील सर्वोत्तम उपाय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -