घरताज्या घडामोडीBrid Flu : २२ वर्षांपूर्वीच पहिल्यांदा आढळला बर्ड फ्लू चा संसर्ग

Brid Flu : २२ वर्षांपूर्वीच पहिल्यांदा आढळला बर्ड फ्लू चा संसर्ग

Subscribe

चीनमधील ४१ वर्षीय व्यक्तीला बर्ड फ्लू स्ट्रेनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिकाऱ्यांनी या लसीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरीही, एका व्यक्तीपासून ते दुसऱ्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणत लागण होण्याचा या स्ट्रेनचा मोठा धोका आहे. या व्यक्तीला H10N3 ची लागण कशी झाली, याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. अनेक बर्ड फ्लू स्ट्रेनच्या बाबतीत एरव्ही अशी प्रकरणे समोरही येत नाही. तर पोल्ट्री व्यवसायात काम करणाऱ्यांच्या बाबतीत अशा स्ट्रेनच्या बाबतीतीत असे प्रकार सर्सास आढळतात. चीनमधील जायंग्सू प्रांतातील एका व्यक्तीला H10N3 ची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर लवकरच या व्यक्तीला डिस्चार्ज मिळणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. जगभरात ओमानमध्ये १४ वर्षीय मुलीला बर्ड फ्लूच्या स्ट्रेनचा संसर्ग झाल्याची घटना १९९८ मध्ये आढळली होती. त्यानंतर अवघ्या १७ महिन्याच्या मुलालाही हा संसर्ग झाल्याचे उदाहरण भारतामध्ये आढळले होते.

बिजिंग नॅशनल हेल्थ कमिशनने स्पष्ट केल्यानुसार झेनजियांगची रहिवासी असणाऱ्या व्यक्तीला २८ एप्रिलला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला H10N3 ची लागण झाल्यावर त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. एका महिन्याच्या उपचारानंतर या व्यक्तीला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत जगभरात H10N3 च्या बाबतीत एकाही व्यक्तीला याचा संसर्ग झाल्याची माहिती नाहीए. हा प्रकार म्हणजे पोल्ट्रीतून मानवी संसर्ग होण्याचा क्रॉस स्पिसीज ट्रान्समिशनचा प्रकार आहे. तर या प्रकारात मोठ्या प्रमाणात मानवापासून दुसऱ्या मानवाला संसर्ग होण्याचा धोका खूपच कमी असल्याचे नॅशनल हेल्थ कमिशनने स्पष्ट केले आहे. ग्लोबल टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. H10N3 चा संसर्ग लो पॅथोजेनिक म्हणजे कोंबड्यांमध्ये पसरणारा नाही. तसेच हा संसर्ग वेगाने पसरणाराही नाही.

- Advertisement -

तर जागतिक आरोग्य संघटनेने रॉयटर्स वृत्तसंस्थेकडे स्पष्ट केले आहे की, सध्याच्या घडीला एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग पसरतोय असे कोणतेही प्रकार आढळले नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या H5N8 च्या पक्षांमधील संसर्गामुळे युरोपियन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांचा मृत्यू झाला आहे. पोल्ट्रीतून मानवांना होणारा संसर्ग हा खूप आश्चर्यचकित करणारा नाही, असेही डब्ल्यूएचओने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी महिन्यात रशियात अशाच पद्धतीने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. बर्ड फ्लू च्या माध्यमातून मानवांना होणाऱ्या संसर्गामुळे H7N9 स्ट्रेनमुळे जवळपास २०१६ आणि २०१७ या वर्षांमध्ये जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -