Bird Flu: रोस्टेड चिकन खाऊन नका, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी पालिकेच्या गाईडलाईन्स

उत्तर दिल्लीच्या नगरपालिकेने आज बर्ड फ्लू संदर्भात बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

bird flu delhi municipal corporation says do not feed roasted chicken
Bird Flu: रोस्टेड चिकन खाऊन नका, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी पालिकेच्या गाईडलाईन्स

देश कोरोना संकंटातून सावरतोय तोपर्यंत बर्ड फ्लूचं संकट देशभरात पसरलं आहे. अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्षी मोठ्या प्रमाणात मरत आहेत. राजधानी दिल्लीत बर्ड फ्लू धोका वाढतच आहे. दिल्लीत अनेक नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे सध्याची परिस्थिती पाहता दिल्ली सरकारने आणि एमसीडीने कडक पाऊले उचलली आहे. आज उत्तर दिल्लीच्या नगरपालिकेची बैठक झाली. ज्यामध्ये बर्ड फ्लू संदर्भात महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली.

उत्तर दिल्ली नगरपालिकेचे महापौर जयप्रकाश यांनी सांगितले की, ‘आज बैठकीत महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली. उत्तर दिल्लीतील असलेल्या सर्व उद्यानांवर लक्ष ठेवलं जात आहे. जेथे मेलेले पक्षी मिळतील, त्या उद्यानात लोकांचं येणं-जाणं बंद केलं जाईल. स्वच्छतेसाठी काळजी घेतली जाईल. आज आम्ही जो रोडमॅप तयार केला आहे, त्यावर सर्व नगरपालिकेचे सर्व नियम आधारित आहेत. आम्ही रेस्टॉरंट आणि हॉटेलला मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत की, रोस्टेड चिकन खाऊ नये, रोस्टेड चिकनमुळे नुकसान होऊ शकते.’

दरम्यान दिल्ली सरकारनं पॅकबंद चिकनच्या आयातीवर बंदी घातली आहे. प्रोसेस्ड चिकन प्रोडक्ट दिल्ली येऊ शकणार नाही आहे. याव्यतिरिक्त दिल्लीमध्ये जे फोटो पाहायला मिळाले आहेत, ते खूप चिंताजनक आहे. दिल्लीत खुलेआम रोस्टेड चिकन विकत आहेत आणि लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर रोस्टेड चिकन न खाण्याचा सल्ला दिला आहे.

याबाबत दुकानदारांनी सांगितलं की, ‘यामुळे मोठं नुकसान होऊन शकतं. विक्रीवर पूर्णपणे बंदी झाली नाही आहे. दुकानं सुरू ठेवायची की नाही याबाबत माहिती दिली नाही आहे. काय खायला द्यायचं आणि नाही? कुठून घ्यायचे आहे, काय करायचे आहे? आतापर्यंत मार्गदर्शक सूचनासंदर्भात आम्हाला सांगितलं नाही आहे. पुढे जसं नियम बनवले जातील तसंच काम केलं जाईल.


हेही वाचा – मुंबई, ठाण्यासह राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव!