घरदेश-विदेशझारखंडमध्ये बर्ड फ्ल्यूचं थैमान; चार हजार कोंबड्या, बदकांची कत्तल करण्यास सुरुवात

झारखंडमध्ये बर्ड फ्ल्यूचं थैमान; चार हजार कोंबड्या, बदकांची कत्तल करण्यास सुरुवात

Subscribe

Bird flu outbreak in Jharkhand |2 फेब्रुवारी रोजी शेतात कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नमुने राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्था, भोपाळ येथे पाठविण्यात आले. या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

Bird flu outbreak in Jharkhand | झारखंडमधील बोकारोमध्ये बर्ड फ्लूने (Bird Flu) थैमान घातले आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी आता येथील 4 हजार कोंबड्या आणि बदकांना मारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लोहांचलच्या फार्ममधील कडकनाथ कोंबडीमध्ये H5N1 विषाणूची लागण झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. बर्ड फ्लूमुळे आतापर्यंत 800 पक्ष्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे 103 कोंबड्यांना मारावे लागले होते.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कोंबडी आणि बदकांसह एकूण 3,856 पक्षी मारण्याची प्रक्रिया शनिवारी संध्याकाळी उशिरा लोहांचलच्या शेतातील एक किलोमीटरच्या परिघात सुरू झाली. या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने रविवारीही पक्षी मारण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे रांची येथील इन्स्टिट्यूट ऑफ अॅनिमल हेल्थ अँड प्रोडक्शनचे संचालक डॉ.बिपिन बिहारी मेहता यांनी सांगितले.

- Advertisement -

डॉ.बिपिन बिहारी महाथा यांनी सांगितले की, 2 फेब्रुवारी रोजी शेतात कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नमुने राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्था, भोपाळ येथे पाठविण्यात आले. या अहवालात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे आता बाधित भागात कोंबडी आणि बदके मारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोंबडी आणि बदकांची कत्तल केल्याप्रकरणी त्यांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिथून संसर्गाला सुरुवात झाली तेथून 1 किमीची त्रिज्या प्रभावित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनाने आधीच घोषित केली आहे. तर 10 किमीच्या परिघातील क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात कोंबडी व बदकांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) अरुण कुमार सिंह यांनी यापूर्वी राज्य सतर्क असल्याचे सांगितले होते. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मोठ्या शेतातील कोंबड्या आणि बदकांचे नमुने गोळा करण्यासाठी वैद्यकीय पथक तयार करण्यात आले. तसेच बाधित क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे नमुने घेण्यास सांगितले.

दुसरीकडे, बर्ड फ्लूचा विषाणू मानवामध्ये पसरण्याचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. बर्ड फ्लूची लागण झालेल्या लोकांसाठी सदर हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वॉर्ड करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की मानवांमध्ये संसर्गाच्या लक्षणांमध्ये पाठदुखी, ताप, खोकला, श्वास लागणे, थंडी वाजून येणे आणि थुंकीतील रक्त यांचा समावेश होतो. पशुसंवर्धन विभागाने एक अॅडव्हायझरी जारी करून लोकांना मृत पक्षी दिसताच कळवण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -