Bird Flu : कोरोनाच्या संकटानंतर ‘बर्ड फ्लू’ चा धोका ; इंग्लंडमध्ये एका व्यक्तीला लागण

कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांदरम्यान बर्ड फ्लूच्या प्रसाराबाबत तज्ञही इशारा देत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ ऑन बर्ड फ्लू) ने बर्ड फ्लू पसरण्याची आणि त्याचे आणखी प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

Risk of 'Bird Flu' in Corona Crisis; Infection of a person in England
Bird Flu : कोरोनाच्या संकटानंतर 'बर्ड फ्लू' चा धोका ; इंग्लंडमध्ये एका व्यक्तीला लागण

गेले अनेक वर्ष संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरु आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या जगभर वाढत आहे. मात्र आता या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातच बर्ड फ्लूचाही धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या प्रादुर्भावातच बर्ड फ्लूचे नवे संकट दार ठोठावत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णांदरम्यान बर्ड फ्लूच्या प्रसाराबाबत तज्ञही इशारा देत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने बर्ड फ्लू पसरण्याची आणि त्याचे आणखी प्रकार असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

डब्ल्यूएचओच्या मते, आशिया आणि युरोपमध्ये बर्ड फ्लूचे आणखी प्रकार आढळून येऊ शकतात.  दक्षिण पश्चिम इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला दुर्मिळ बर्ड फ्लूची लागण झाली आहे.UKHSA ने दिलेल्या अहवालानुसार, बर्ड फ्लूची लागण झालेला हा व्यक्ती मोठ्या संख्येने पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्याला संसर्ग झाला होता. त्या व्यक्तीने संक्रमित पक्षी आपल्या घराजवळ ठेवले होते.

त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचा शोध घेण्यात आला आहे. सर्व लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. संक्रमित व्यक्तीबद्दल सांगण्यात आले की त्या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच,त्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आली आहे.बर्ड फ्लूचा संसर्ग एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस H5N1 मुळे होतो. आत्तापर्यंत बर्ड फ्लूचा धोका माणसाला नाही असे समोर आले आहे, मात्र खबरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी जनतेला मृत पक्ष्यांना हात न लावण्याचे आवाहन केले आहे. UKHSA ने सांगितले की बर्ड फ्लूची लागण झालेल्या पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.

UKHSA चे मुख्य वैज्ञानिक अधिकारी प्रोफेसर इसाबेल ऑलिव्हर यांनी सांगितले की, एव्हीयन फ्लूच्या विषाणूचा माणसांना धोका खूप कमी असतो, परंतु काही प्रमाणात हा विषाणू मानवांमध्ये पसरल्याची प्रकरणे समोर आली आहेत.


हेही वाचा – मुंबईतील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे Online वर्ग सुरू करून सर्वांना Work From Homeची परवानगी द्या,शिक्षणमंत्र्यांकडे मागणी