घरताज्या घडामोडीBird Flu Scare : बर्ड फ्लूचा कहर ! केरळमध्ये १२ हजार बदकांची...

Bird Flu Scare : बर्ड फ्लूचा कहर ! केरळमध्ये १२ हजार बदकांची कत्तल

Subscribe

केरळमध्ये बर्ड फ्लू (Bird Flu) ची प्रकरणे ही अलाप्पुझा जिल्ह्यात समोर आली होती. त्यानंतर १२ हजार बदकांची कत्तल करण्याचा प्रकार समोर आला आहे. थाकाझी ग्रामपंचायतीने शुक्रवारी घेतलेल्या निर्णयामुळे १२ हजार बदकांची कत्तल करण्यात आली. केरळमध्ये सध्या अनेक भागातून भोपाळला सॅम्पल चाचण्यांसाठी आणि नमुन्यासाठी पाठवण्यात येत आहेत. (bird flu keral alappuzha disctrict 12000 ducks culled with district collector direction)

अलाप्पुझा जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी तत्काळ बैठक घेत कारवाईचे आदेश दिले. इतर ठिकाणी बर्ड फ्लूचा संसर्द रोखण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला. थाकाझी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड १० मध्ये बर्ड फ्लूचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळेच या भागाला कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या भागात वाहनांचा प्रवेश तसेच लोकांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार अंड्यांची विक्री, मटन विक्री करण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. तसेच बदके, कोंबड्या, पानकोंबड्यांचे खत आणि स्थानिक पातळीवर कुक्कुटपालनासाठीही बंदी घालण्यात आली आहे. हे निर्बंध चंपकुलम, नेडुमुडी, मुत्तर, वियापुरम, करूवट्टा, थ्रिकुनापुझा, थकाझी, अंबालापुझा, एडाथवा आणि हरिप्पद महापालिका क्षेत्रातही ही बंदी घालण्यात आली आहे.

थाकाझी पंचायची या बदकांची कत्तर करून त्यांना १ किलोमीटर परिसरात दफन करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रतिबंधित क्षेत्रात लोकांना मज्जाव करण्यासाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे. पशु संवर्धन विभागालाही रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या माध्यमातून तत्काळ कारवाई करतानाच पक्षांना दफन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

ज्याठिकाणी बर्ड फ्लूचा संसर्ग आढळला आहे, त्याठिकाणी या रॅपिड रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आल्या आहे. तसेच बर्ड फ्लूच्या रोगाच्या प्रतिबंधात्मक औषधांचाही पुरवठा करण्यात आला आहे. या संसर्गाची चाचणी करण्यासाठी सहाय्यक वनसंवर्धन अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्थलांतरीत पक्षांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे का ? हेदेखील पडताळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पशू संवर्धन विभागाला दैनंदिन पातळीवर अहवाल दाखल करतानाच बर्ड फ्लू संसर्ग रोखण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -