Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश BIS Recruitment 2021: भारतीय मानक ब्युरोमध्ये २६ विविध पदांसाठी भरती, असा करा...

BIS Recruitment 2021: भारतीय मानक ब्युरोमध्ये २६ विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Related Story

- Advertisement -

BIS Recruitment 2020: भारतीय मानक ब्युरोने (Bureau of Indian Standards, BIS) साइंटिस्ट-बी ( Scientist-B) पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. याअंतर्गत एकूण २६ विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. योग्य आणि इच्छुक उमेदवार भारतीय मानक ब्युरोच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.bis.gov.in) अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ५ जून २०२१ पासून सुरु झाली असून अंतिम मुदत २५ जून २०२१ पर्यंत आहे.

BIS ने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, गेट परीक्षा २०१०९, २०२० आणि २०२१ च्या आधारे सिव्हिल इंजिनियरिंग, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनियरिंग, पर्यावरण इंजिनियरिंग, रसायन विज्ञान, टेक्सटाइल इंजिनियरिंग अशा एकूण २६ पदांवर ही भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ३० वर्षापेक्षा अधिक असू नये. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार सुट देण्यात आली आहे. अर्ज करताना उमेदवाराने संपूर्ण नोटिफिकेशन वाचून लक्षपूर्वक अर्ज भरावा. अर्जात काही गडबड झाल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.

तारखा लक्षात ठेवा

- Advertisement -

नोटिफेशन जाहीर झाल्याची तारीख – ५ जून २०२१

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जून २०२१

- Advertisement -

फी जमा करण्याची शेवटची तारीख – २५ जून २०२१

एकूण रिक्त पदे

पर्यावरण इंजिनियरिंग – ०२

सिव्हिल इंजिनियरिंग- ०२

सायन विज्ञान- ०७

टेक्सटाइल इंजिनियरिंग- ०४

भारतीय मानक ब्यूरोने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारास सेलेक्शन गेट परीक्षेत मिळविलेल्या गुणांच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी अर्जदार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.

पगार

सायंटिस्ट-बी च्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना ८७, ५२५ रुपये पगाराची मर्याद आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज 

 www.bis.gov.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन अर्ज करु शकता.


 

- Advertisement -